• नागभीड येथे बिलासपुर – चेन्नई सुपरफास्ट ट्रेनच्या थांब्याचा शुभारंभ सोहळा संपन्न* • खासदार अशोकभाऊ नेते व आमदार बंटीभाऊ भांगडीया यांनी दाखवली हिरवी झेंडी

0
418

 

• *विविध संघटनांनी दिले रेल्वे मंडल प्रबंधकांना रेल्वे संदर्भातील निवेदन*

 

अरुण रामुजी भोले

नागभीड तालुका प्रतिनिधी

 

 

नागभीड —कोरोना काळात बंद झालेल्या सर्वच रेल्वेगाड्या सुरु झाल्यानंतर गोंदिया- नागभीड- बल्लारपुर या मार्गावरुन धावणाऱ्या सुपरफास्ट ट्रेनपैकी एकाचाही नागभीड येथे थांबा नसल्याने प्रवाशांमध्ये असंतोष होता. याबाबत सातत्याने दपुम रेल्वेचे झेडआरयुसीसी सदस्य संजय गजपुरे यांनी रेल्वे प्रशासन व लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा केला. याची दखल घेत खासदार अशोकभाऊ नेते यांनी केंद्रिय रेल्वेमंत्री नाम. अश्विनजी वैद्य यांच्याकडे पाठपुरावा केल्याने नागभीड येथे १२८५१ / १२८५२ बिलासपूर – चेन्नई – बिलासपूर सुपर फास्ट एक्सप्रेस ट्रेनचा (स्टॉपेज) थांबा मंजूर झाला.

 

या अनुषंगाने रविवारी गडचिरोली- चिमुर क्षेत्राचे खासदार अशोकभाऊ नेते , चिमुर- नागभीड चे आमदार कीर्तिकुमार (बंटीभाऊ) भांगडीया यांच्या शुभहस्ते व दपुम रेल्वे नागपुर मंडल प्रबंधक मनिंदरजी उप्पल ,दपुम रेल्वेचे झेडआरयुसीसी सदस्य संजय गजपुरे यांच्या विशेष उपस्थितीत हिरवी झेंडी दाखवुन थांब्याचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी खासदार अशोकभाऊ नेते व आमदार बंटीभाऊंनी बिलासपूर – चेन्नई – बिलासपूर सुपर फास्ट एक्सप्रेस ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रथम प्रवाशांचे पुष्पहार घालून व रेल्वे स्थानकावर पेढे वाटून स्वागत केले. पहिल्याच दिवशी या गाडीतून नागभीड रेल्वे स्थानकातुन २३ प्रवाशांनी तिकिट काढुन प्रवासाला सुरुवात केली.

 

यावेळी लोकप्रतिनिधी व रेल्वे अधिकारी यांच्या समवेत झालेल्या बैठकीत नागभीड व्यापारी संघाचे अध्यक्ष गुलजार धम्माणी व सचिव विजय बंडावार तसेच पदाधिकारी , भाजपाचे तालुकाध्यक्ष संतोष रडके व पदाधिकारी , शिवसेनेचे मनोज लडके व पदाधिकारी यांनी नागभीड येथे चांदाफोर्ट- जबलपुर सुपरफास्ट ट्रेनला नागभीड येथे थांबा देण्यात यावा अशी जोरदार मागणी केली. तर संजय गजपुरे यांनी गोंदिया- नागभीड- बल्लारपुर मार्गावर दुसरी रेल्वे लाईन मंजुर करावी अशी मागणी केली.

याप्रसंगी रेल्वे स्थानक प्रशासनाशी चर्चा करतांना भाजपा तालुका नागभीड व ऑटो रिक्षा युनियन च्या वतीने रेल्वेच्या विविध समस्यांसंदर्भात दिलेले निवेदने आमदार बंटीभाऊंनी स्वीकारून सर्वांना आश्वस्त केले. याप्रसंगी नागभीड रेल्वे स्थानकाचे स्टेशन प्रबंधक करमनकर यांनी अतिथींचे व उपस्थितांचे स्वागत केले. दपुम रेल्वे चे नागपुर मंडल प्रबंधक मनिंदरजी उप्पल यांनी निवेदन स्विकारुन उपस्थितांशी चर्चा केली.

 

यावेळी प्रामुख्याने भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य वसंतभाऊ वारजूकर, भाजपा जिल्हा संघटन महामंत्री संजयभाऊ गजपुरे, भाजपा तालुकाध्यक्ष संतोषभाऊ रडके, माजी नगराध्यक्ष न.प. नागभीड प्रा. उमाजी हिरे, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष गुलजार धम्मानी, कृ.उ.बा. समिती सभापती आवेश पठाण, कृ.उ.बा. समिती माजी सभापती विलासजी दोनाडे, माजी भाजपा तालुकाध्यक्ष होमदेव मेश्राम ,मेंढा (कि.) चे सरपंच आनंदजी कोरे, माजी उपाध्यक्ष न.प. नागभीड गणेश तर्वेकर, माजी बांधकाम सभापती न.प. नागभीड सचिन आकुलवार, माजी सरपंच जहांगीर कुरेशी , माजी पं.स. सभापती गीताताई पालपनकर , भाजयुमो तालुकाध्यक्ष देवानंद तय तसेच भाजपा व शिवसेना पदाधिकारी , व्यापारी संघाचे पदाधिकारी तथा पत्रकार , कार्यकर्ते आणि प्रवासी, रेल्वेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here