नेचर फाउंडेशनद्वारे करिअर मार्गदर्शन

104

नेचर फाउंडेशनद्वारे करिअर मार्गदर्शन

दीक्षाभूमी नागपूर येथे आयोजन : शेकडो विद्यार्थ्यांची उपस्थिती

 

प्रतिनिधी/नेचर फाउंडेशन, नागपूर या स्वयंसेवी संस्थेद्वारे दीक्षाभुमी नागपूर येथे करियर मार्गदर्शन शिबीर संपन्न झाले.या शिबिरात शेकडो विद्यार्थ्यांनी उपस्थिती दर्शवून लाभ घेतला.

‘अभ्यास तुमचा,संकल्प आमचा’ या उपक्रमाअंतर्गत या करियर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मानव अधिकार संरक्षण मंच चे आशिष फुलझेले,नेचर फाउंडेशन चे अध्यक्ष प्रवीण भीमटे, सचिव निलेश नन्नावरे,मॅजिक उपक्रमाचे सदस्य चंदू सावसाकडे उपस्थित होते.

ग्रामीण भागातील विद्यार्थी येथील स्थानिक वसतिगृहात राहून शिक्षण घेत असतात.भविष्यात त्यांची वाटचाल योग्य दिशेने व्हावी.त्यांना विविध नामवंत विद्यापीठात प्रवेश मिळावा.अनेकांना शासकीय योजनांची माहिती त्या साठी करावा लागणारा पाठपुरावा ,भविष्यात शिक्षणानंतर अनेक संध्या उपलब्ध असतात या साठी स्पर्धा परीक्षा, व्यावसायिक शिक्षण,व्यवसाय उभारणी-भांडवल निर्मिती या बाबत या शिबिरात मार्गदर्शन विविध क्षेत्रातील तज्ञ मार्गदर्शक यांच्याद्वारे करण्यात आलं. या शिबिराला शेकडो विद्यार्थी -विद्यार्थिनी उपस्थित होते.

advt