राष्ट्रवादी कांग्रेसचा पक्ष बांधणीसाठी पक्ष श्रेष्टींचा कसनसुर दौरा

0
503

राष्ट्रवादी कांग्रेसचा पक्ष बांधणीसाठी पक्ष श्रेष्टींचा कसनसुर दौरा

रा.काँ.पक्षाच्या कार्यकर्त्यांची घेतली आढावा बैठक

बूथ कमिटी व पक्ष मजबुतीसाठी धडपड

गडचिरोली सुखसागर झाडे :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बूथ कमिटी व पक्ष बांधणीसाठी एटापल्ली तालुक्यातील कसनसुर येथे आमदार धर्मराव बाबा आत्राम, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम यांच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, महिला जिल्हाध्यक्षा शाहीन भाभी हकीम आदींनी दौरा करून गावकऱ्यांशी चर्चा केली आणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेतली.
यावेळी बबलू भैया हकीम , राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऋषिकांत पापडकर, पक्षाचे जिल्हा मुख्य सचिव संजय कोचे, जिल्हा उपाध्यक्ष योगेश नांदगाये, तालुकाध्यक्ष दौलत दहागावकर, सपनाताई कोडापे, लीलाधर भरडकर, आदी मान्यवर होते.
आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी गावकऱ्यांशी हितगुज व चर्चा करून नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेऊन गावात जनजागृती करावी यासाठी लसीचे महत्त्व पटवून दिले. तसेच कसनसुर व परिसराच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी बोलून दाखविले.
तर पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर यांनी ग्रामीण व खेडी गावे समृद्ध व सुजलाम सुफलाम व्हावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आधीपासूनचे व्हिजन असून पक्षाचे पाळेमुळे प्रत्येक गावा-गावात व घरा-घरात पोहचण्यासाठी बूथ कमिटी आणि जिल्हा परिषद व पंचायत समिती क्षेत्रनिहाय प्रमुख यांची निवड व नियुक्तीचे मिशन सुरू असून जिल्हाभर हे मिशन राबविले जात आहे यात प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभाग घेऊन बूथ कमीट्या स्थापित करण्याचे व पक्षाला बळकट करण्याचे आवाहन केले.
याचवेळी पक्षाचे महिला जिल्हाध्यक्ष शाहीन भाभी हकीम, तालुकाध्यक्ष दौलत दहागावकर यांनी सुद्धा पक्षाच्या पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शन केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते गण उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here