तालुक्यातील ग्रामपंचायत उपसारपंचाची उद्याला निवड

0
354

तालुक्यातील ग्रामपंचायत उपसारपंचाची उद्याला निवड

उपसरपंचपदी वर्णी लावण्यासाठी रस्सीखेच सुरू

विरूर स्टेशन/अविनाश रामटेके

उपसरपंच पद हें निवडुन आलेल्या सदस्य मधून होत असल्याने नवनिर्वाचित सदस्यांना ग्रामपंचायतीच्या गावगवड्यात महत्व प्रत झाले आहे. अकरा सदस्य असलेल्या विरुर ग्रामपंचायत च्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणूकित कांग्रेस गटातील कार्यकर्त्यांनी विरोधी लाटेवर मात करीत सरपंचासह आपले आठ सद्स्य निवडुन आणले तर यावेळी भाजपाला जमेची बाजू असतांना सुद्धा आंतरिक कलहामुळे फक्त एका सदस्यांवर समाधान मानावे लागले व एकेकाळी विरुर राजकारणांत वचक असलेले शेतकरी संघटनेने आपल्या दोन सदस्य काढण्यात यशस्वी झाले परंतु नव्यानेच निवडणुकीत भाग घेत गोंडवाना पार्टी ही स्वतंत्र लढत एक महिला सदस्य निवडुन आणून आपले खाते उघडले तर दुसऱ्या क्रमांकावर सरपंच पदाचा उमेदवार राहिल्याने हा धक्का पाहता मतदार याकडे मोठ्या कुतुहलाने बघत असल्याने दिसून येत आहे.

विरुर हे पेसा योजनेत येत असल्यानें सरपंच पदाकरिता अनुसूचित जमाती सर्वसाधारणसाठी राखीव होते , यावेळीं यात कांग्रेस प्रणित अनिल बंडू आलम यांनी बाजी मारली तर पक्षाच्या कार्यर्त्यांनी चांगली कामगिरी करीत सात सदस्य निवडुन आणून आपले बहुमत सिद्ध केले.

विरुर येथे अनुसूचित जातीची लोकसंख्या ही जास्त असल्याने नेहमीच यांचा बोलबाला राहिल्या चे दिसुन येते कारण ही तसेंच, मागील वीस वर्षांपासून विरुर ग्रामपंचायत वर अनुसूचित जातीचा च व पुरुष उपसरपंच च्या आसनावर विराजमान होत आहे ,मात्र यावेळी बहुमत असलेल्या गटात प्रथमच खुल्या प्रवर्गातून महिला निवडून आल्याने यावेळीं उपसरपंच पदाकरिता फेरबद्दल बघायला मिळणार काय हे गावकऱ्यांत चर्चा होताना दिसून येत आहे.

मात्र दि 11 लाच हे चित्र स्पष्ट होऊन नवनिर्वाचित सदस्य हे गावातील विकासकामत हातभार लावून गावाची कायापालट करतील अशी विरुर येथिल जनता अपेक्षा करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here