शिधापत्रिकेसोबत आधारकार्ड लिंक न केल्यास लाभार्थ्यांना स्वस्तधान्यापासून राहावे लागेल वंचीत

0
483

शिदापत्रिकेसोबत आधारकार्ड लिंक न केल्यास लाभार्थ्यांना स्वस्तधान्यापासून राहावे लागेल वंचीत

गोंडपिपरी(सुरज माडुरवार)

केंद्र शासनाने राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत शिधापत्रिकेसोबत मोबाईल व आधार सिडींग करण्याचा निर्णय घेतला आहे.वितरण प्रणालीसाठी हा महत्वाचा प्रकल्प आहे.त्यामुळे कुटुंबातील प्रत्येकानी शिधापत्रिकेसोबत आधार कार्ड ची नोंदणी करावी असे आव्हाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
केंद्र शासनाच्या सूचनेनुसार संपूर्ण राज्यभर शिधापत्रिकेसोबत आधार कार्ड नोंदणी करण्याचे काम सुरू आहे.यासाठी आधार कार्डची अद्यापही नोंदणी न केलेल्या लाभार्त्यांना स्वस्त धान्य दुकान निहाय यादी तयार करून त्यांच्या मार्फतीने ई-पास उपकरणातील ई-केवायसी व मोबाईल क्रमांक जोडण्याचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.याकरिता प्रशासनाच्या वतीने गोंडपिपरी तालुक्यात तहसीलदार के डी मेश्राम यांच्या मार्गदर्शनात जागृती मोहीम राबविण्यात येत आहे.
तालुका प्रशासन व रास्तभाव धान्य दुकानाच्या मार्फतीने वारंवार सूचना देऊन अनेकांनी शिधापत्रिकसोबत अध्यपही आधार कार्ड नोंदणी केली नाही.येत्या ३१ जानेवारी २०२१ पर्यंत नोंदणी न केल्यास लाभार्थ्यांना आधार कार्ड ची नोंदणी होईपर्यंत अन्न धान्यापासून वंचीत राहावे लागणार असल्याची माहिती तहसीलदार के.डी मेश्राम यांनी दिली असून लवकरात लवकर आधार कार्डची शिधापत्रिकेसोबत नोंदणी करावी असे आव्हाहन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here