राष्ट्रीय महामार्ग व राज्य महामार्गात मोटारसायकल चालवण्याची वेगळी व्यवस्था असावी…

0
429

राष्ट्रीय महामार्ग व राज्य महामार्गात मोटारसायकल चालवण्याची वेगळी व्यवस्था असावी…

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कडे केली निवेदनातून मागणी

 

 

गडचांदुर/कोरपना, प्रवीण मेश्राम : दिवसेंदिवस वाहनाची संख्या वाढत आहे. त्यामुळे अपघात सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. करीता काही पर्याय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी याचे कडे निवेदनाच्या माध्यमातून सुचविले तथा मागणी सुद्धा केली आहे. नितीन गडकरी जेव्हा पासून रस्ते वाहतूक मंत्री झाले तेव्हा पासून रस्ता दुरुस्ती च्या कामात आधुनिक पद्धतीने रस्ता बनवण्याच्या कामात मोठी चालना मिळाली असून आधुनिक पद्धतीने रस्ता बनविण्याचे कामे प्रगती पथावर आहेत. यात शंका नाही. मात्र अपघात ही एक मोठी समस्या आहे. अशा अपघातामुळे कित्येक कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत. याकरीता जन हिताचा विचार करून अब्दुल सिद्दीकी यांनी गडकरी यांच्याकडे निवेदनातून मागणी केली आहे.
ज्याप्रमाणे रस्ता बनविताना चार चाकी वाहन फोर लेन टू लेन रस्त्यावर पायी चालण्यासाठी वेगळी जागा सोडली जाते. त्याचप्रमाणे मोटार सायकल साठी सुद्धा वेगळी जास्त जागा सोडून व्यवस्था असावी. यामुळे मोटारसायकल अपघात कमी होईल. या रास्त मागणी कडे गडकरी यांनी प्रामुख्याने लक्ष देण्याचे बोलले असून त्यांनी या सूचनेचे स्वागत केले आहे. दर वर्षी या अशा अपघातात वय १९ ते ३६ वर्ष वयाच्या व्यक्तीचे प्रमाण अधिक आहे. याला आळा बसेल असे सिद्दीकी यांनी निवेदनातून सांगितले. यापुढे रस्ते बांधकामात दिलेल्या सुचनांचा स्वीकार केला जाईल असे गडकरी यावेळी म्हणाले. सूचना ऐकून घेतल्याबद्दल सिद्दीकी यांनी गडकरींचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here