उत्तम कापुस उपक्रम अंतर्गत सोनुर्ली येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

0
440

उत्तम कापुस उपक्रम अंतर्गत सोनुर्ली येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

अंबुजा सिमेंट फाऊंडेशन उप्परवाही तर्फे आयोजन

कोरपना : या कार्यक्रमात पर्यावरनाचे महत्त्व, झाडे लावा झाडे जगवा, पाणी व्यवस्थापन, पाणी अडवा पाणी जिरवा, शेतात काम करताना घ्यावयाची सुरक्षा, समान काम समान वेतन, बालमजुरी, किटकनाशकाचे डब्ब्या ची विलेवाट लावणे इत्यादी विषयावर मार्गदर्शन सुचिता खडसे यांनी केले. त्यानंतर लिड फार्मर च्या हस्ते व सुचिता खडसे यांनी झाडाचे वितरण गावातील शेतकरी तसेच महिला शेतकरी यांना वृक्षा चे वितरण करण्यात आले व झाडे नुसते लावायचे नाही तर झाडे वाचवुन पर्यावरनाचे सरंक्षण करण्यास हातभार लावावे असे सांगुन झाडे वाटप करण्यात आले. विरूर गाडेगावं चे उपसरपंच शैलाताई खमानकर यांच्या हस्ते झाडे लावण्यात आली.
यावेळी गावातील गावकरी मंडळी तसेच विरूर गाडेगावं चे उपसरपंच शैलाताई खामनकर, ग्रामपंचायत सदस्य, उंदरू पाटील बांदुरकर गोवर्धन बांदुरकर, विकास आसुटकर, सारंग बांदुरकर, संदिप बांदुरकर, सुभाष बांदुरकर, शुभम बांदुरकर, भानुदास डवरे व इतर शेतकरी उपस्थित होते. गावकऱ्यांच्या मदतीने हा कार्यक्रम पार पाडण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here