महसूल विभागाची रात्री धडक कारवाई !

0
591

महसूल विभागाची रात्री धडक कारवाई !
रेती तस्करांचे धाबे दणाणले!
एक जेसीबी व दोन ट्रैक्टर जप्त !🛑🟨चंद्रपूर 🟩🟣किरण घाटे☀️🟢🌼 काल शनिवार दि. २जानेवारीला रात्रो आरवट गावा पासून 5 कि.मी. अंतरावर असलेल्या जामिनीतुन रेतीचे JCB द्वारे उत्खनन होत असल्याची गुप्तरित्या खात्रीलायक माहीती मिळाल्याने चंद्रपूरचे उपविभागीय अधिकारी राेहन घुगे यांचे निर्देशानुसार व तहसीलदार निलेश गाैंड यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार राजू धांडे , तलाठी प्रकाश सुर्वे,प्रवीण वरभे, शैलेश दुवावार, विशाल कुरेवार, रवि तल्हार व राहुल भोंगळे या भरारी चमुने 5 कि.मी. दूर जंगलात वाघाचा वावर सुरू असलेल्या ठिकाणी अंधारात पायदळ जाऊन कारवाई केली 🌼🛑☀️या वेळी मौक्यावरील 1 JCB व 2 ट्रैक्टर जप्त करून ते रात्रो 12. 25 वाजता तहसील कार्यालय येथे जमा केले .🌼🟣🟢🌀प्राण धाेक्यात टाकुन केलेल्या या कारवाईचे चंद्रपूरकरांनी स्वागत केले आहे.तर या रात्रीच्या धडक कारवाई मुळे रेती माफियांचे अक्षरशा धाबे दणाणले आहे हे तेवढेच खरे !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here