नवसारी प्रभागातील हार्दिक कॉलनी येथील रस्ते डांबरीकरणाने टाकणार कात..

0
573

नवसारी प्रभागातील हार्दिक कॉलनी येथील रस्ते डांबरीकरणाने टाकणार कात…

आमदार सौ. सुलभाताई खोडके यांच्या हस्ते विकास कामांचे भूमिपूजन

प्रतिनिधी/देवेंद्र भोंडे

अमरावती : अमरावती महानगरपालिका क्षेत्राअंतर्गत प्रभाग क्रमांक ०३ स्थित हार्दिक कॉलनी येथील रस्ते डांबरीकरण कामाचे आमदार सौ. सुलभाताई संजयराव खोडके यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. सर्वप्रथम श्रद्धा और सबुरी चा संदेश देणाऱ्या संत साईबाबा यांच्या प्रतिमेचे आमदार महोदयांच्या हस्ते पूजन व माल्यार्पण करण्यात आल्यानंतर कार्यक्रमास सुरुवात झाली. तदनंतर हार्दिक कॉलनी वासियांच्या वतीने सौ. सुलभाताई खोडके यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. याप्रसंगी शेगोकार यांच्या घरापासून ते नगरोत्थान रस्त्यापर्यंत च्या रस्ते डांबरीकरणाच्या कामाची कुदळ मारीत आमदार महोदयांनी यावेळी औपचारिकता साधली. प्रभागा-प्रभागामध्ये विकास कामांची पूर्तता करण्यासह जनसमस्यांचे निराकरण करण्याला आपले सर्वतोपरी प्राधान्य राहील. या शब्दामध्ये भूमिपूजन कार्यक्रमादरम्यान आमदार सौ.सुलभाताई खोडके यांनी स्थानीय नागरिकांशी संवाद साधला. नगरसेवक प्रशांत डवरे प्रयत्नातून रस्ते बांधकाम तथा आमदार महोदयांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नाद्वारे ठोस कृति कार्यक्रम राबविण्यात येत असल्यामुळे, हार्दिक कॉलनीसह आजूबाजूच्या परिसराचा कायापालट होत असल्याची बाब स्पष्ट करतांना नागरिकांनी यावेळी आमदार सौ. सुलभाताई खोडके यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करीत त्यांचे अभिनंदन करण्यासह आभार मानले. याप्रसंगी नगरसेवक प्रशांत डवरे, नगरसेविका नीलिमा काळे, मनपा चे सहाय्यक अभियंता आशिष अवसरे, वर्षा कुऱ्हेकर , सुधाकर विघे, हरिदास ठाकरे , अरुण मोहोड, प्राचार्य मानकर, शेखर कडू, निलेश ठाकरे, हेमलता विघे, सविता गौरखेडे, वानखडे, बहाळे, चोरे, आदीसंहित स्थानीय नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाअंती सर्व उपस्थितांचे नगरसेवक प्रशांत डवरे यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here