लालनाला प्रकल्पग्रस्तांवर अन्याय होऊ देणार नाही-आमदार किर्तीकुमार भांगडीया

0
481

लालनाला प्रकल्पग्रस्तांवर अन्याय होऊ देणार नाही-आमदार किर्तीकुमार भांगडीया

उपविभागीय अधिकारी कार्यालयात घेतला आढावा

योग्य मोबदला देण्याचे प्रशासनाला निर्देश

तालुका प्रतिनिधी
चिमूर

तालुक्यातील शेतकऱ्यांना वरदान ठरणाऱ्या लाल नाला प्रकल्पाचे काम प्रशासनाच्या लालफितशाही मुळे थंडबस्त्यात होते. या क्षेत्रातील लाभान्वित शेतकऱ्यांची मागनी लक्षात घेऊन आमदार किर्तीकुमार भांगडिया यांनी शासनदरबारी पाठपुरावा करीत या प्रकल्पाचे काम सुरू केलं.या प्रकल्पात बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत पूर्ण मोबदला मिळगून देण्याचं आश्वासन चिमूर येथील उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे बाधित शेतऱ्यांना आमदार भांगडीया यांनी दिले आहे.

तालुक्यातील खडसंगी परिसरातील खुर्सापार, रेंगाबोडी, बोथली ,वहानगाव ,भिवकुंड खापरी या गावातील शेतकऱ्यांच्या शेतातून लाल नाला कालवा मधील कॅनल जात असून त्या प्रकल्प ग्रस्त शेतकऱ्यांच्या जमिनी ओलती असताना मात्र महसूल प्रशासनाने कोरडी दाखविल्याने शेतजमीन मूल्याकन कमी होत असल्याने शेतकरी नाराज झाले होते तेव्हा आमदार किर्तीकुमार भांगडीया यांनी दखल घेत एसडीओ मार्फत बैठक घेऊन प्रकल्प ग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणार असल्याचे सांगितले.
खडसंगी परिसरातील लाल नाला प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या समस्या संदर्भातील बैठक आमदार बंटी भाऊ भांगडीया यांनी उपविभागीय कार्यालय चिमूर येथे घेत एसडीओ संकपाल यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन प्रकल्प शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्याचे सांगत शेतकऱ्यांना
प्रशासनाने न्याय देण्याचे सांगितले.

यावेळी वसंत वारजूकर, डॉ श्यामजी हटवादे
पस सदस्य अजहर शेख, बकारामजी मालोदे, राजु देवतळे,लालनाला प्रकल्पग्रस्त शेतकरी एकनाथ थुटे, जोगेश्वर थुटे, अर्जुन थुटे, सुरेश पानसे, बाबाजी येलेकर, दिलीप कुबडे , तसेच पस सदस्य प्रदीप कामडी, विनोद चोखरे, सुरज नरुले , रमेश कंचर्लावार, सतीश जाधव , संजय कुंभारे प्रशांत चिडे, जयंत गौरकर आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here