कोरपना येथे अन्नधान्य किट वाटप

0
505

कोरपना येथे अन्नधान्य किट वाटप

कोरपना – अनुसूचित जमाती कुटुंबांना साहाय्य करण्यासाठी खावटी अनुदान योजनेअंतर्गत अन्नधान्य किट वाटप राजुरा चे आमदार सुभाष धोटे यांचे हस्ते कोरपना येथील स्वर्गीय भाऊराव पाटील चटप आश्रम शाळेत शुक्रवारी करण्यात आले.
याप्रसंगी सहाय्यक प्रकल्प अधिकारी बेलेकर, जिल्हा परिषद सदस्या विना मालेकर, कल्पना पेचे, पंचायत समिती उपसभापती सिंधू आस्वले, पंचायत समिती सदस्य श्याम रणदिवे, संभाजी कोवे, माजी समाज कल्याण सभापती झिबल जुमनाके, उत्तम पेचे, भाऊराव कारेकर, भाऊराव चव्हाण, रसूल पटेल, पंढरी चने, सुरेश मालेकर, नितीन बावणे, रोशन आस्वले, इस्माईल शेख, स्वर्गीय संगीताताई चटप उच्च माध्यमिक आश्रम शाळेचे प्राचार्य मारोती जूनघरी, मुख्याध्यापक आडकीने आदी उपस्थित होते. यावेळी कोरपना परिसरातील लाभार्थ्यांना अन्नधान्य किटचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन प्रदीप गेडाम यांनी केले.यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here