‘साथ जियेंगे, साथ मरेंगे’ च्या कसमे-वादे घेत प्रेमविरांनी संपविली जीवनयात्रा

0
985

‘साथ जियेंगे, साथ मरेंगे’ च्या कसमे-वादे घेत प्रेमविरांनी संपविली जीवनयात्रा

चामोर्शी (गडचिरोली), सुखसागर झाडे

 

चामोर्शी तालुक्यातील रामणगट्टा येथील रहिवासी साथ जियेंगे, साथ मरेंगेच्या आणाभाका घेतलेल्या दोन प्रेमवीरांनी मुल तालुक्यातील केळझर लगतच्या जंगलात गळफास लावुन जीवनयात्रा संपविल्याची घटना उजेडात आली आहे.

 

वनपरिक्षेत्र चिचपल्ली अंतर्गत येत असलेल्या अजयपूर केळझर मार्गावरील पिंपळझोरा (झोपला मारोती) लगतच्या कक्ष क्रमांक ४२८ मध्यें वनरक्षक महादेव मोरे सहका-यांसह गस्त करीत असतांना मार्गापासून अर्धा कि.मी. आंत जंगलात पुरूष आणि महिलेचे प्रेत कुजलेल्या अवस्थेत आढळून आले.

 

त्यामूळे सदर प्रकाराची माहिती वनरक्षक महादेव मोरे यांनी पोलीस दुरक्षेत्र चिरोली येथील पोहेकाॅं अकबर पठाण यांना दिली. मिळालेल्या माहितीच्या आधारे अकबर पठाण सहका-याला घेवून घटनास्थळी पोहोचले असता त्याठिकाणी पुरूष आणि महिलेेचे प्रेत कुजलेल्या अवस्थेत जमीनीवर पडून असल्याचे दिसल्याने त्यांनी पंचनामा करून कुजलेले दोन्ही प्रेत उत्तरीय तपासणी करीता उपजिल्हा रूग्णालय मूल येथे घेवून आले.

 

सदर घटना उघडकीस येण्याचे दहा दिवसांपूर्वी घटना स्थळालगतच्या मार्गावर चिरोली पोलीसांनी बेवारस अवस्थेत उभी असलेली होंडा शाईन क्र. एमएच-३४-एजे-५८८० ताब्यात घेतली होती. बेवारस अवस्थेत सापडलेल्या दुचाकीमधील कागदपत्रावरून पोलीसांच्या तपासात सदर दुचाकी चंद्रपूर येथील मूळ मालकाने विक्री केल्याचे लक्षात आले. त्यामूळे आज ना उदया सदर दुचाकीचा मालक येईलच. या विश्वासाने तपास सुरू असतांनाच दुचाकी सापडलेल्या जागेपासून अर्धा कि.मी. अंतरावर कुजलेल्या अवस्थेत दोन प्रेत सापडले. त्यामुळे दहा दिवसांपुर्वी बेवारस सापडलेली दुचाकी मृतकाची असावी. अशी शंका पोलीसांना आली.

 

मृतक पुरूषाच्या खिशात सापडलेल्या कागदपत्रावरून मृतक राजु होमदेव आत्राम रा. रामणगट्टा पो.स्टे. आष्टी असल्याची खात्री पटली. सदर प्रकाराची माहिती अकबर पठाण यांनी ठाणेदार सतिशसिंह राजपुत यांना दिल्यानंतर पुढील तपासा करीता ठाणेदार राजपुत यांनी पोलीस स्टेशन आष्टी येथे संपर्क करून मृतक राजु आत्रामच्या कुटूंबियांना मूल येथे बोलावून घेतले.

 

मृतक राजुच्या पालकांनी सदर प्रेताची पाहणी केली तेव्हा मृतक पुरूष राजु आणि मृतक महिला सलोनी मडावी असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे प्रारंभीक तपास केला तेव्हा असे समजले की, पोलीस स्टेशन आष्टी अंतर्गत येत असलेल्या चामोर्शी तालुक्यातील रामणगट्टा येथील राजु होमदेव आत्राम (२२) आणि सलोनी रामकृष्ण मडावी (१८) यांचे एकमेकांवर जीवापाड प्रेम होते.

 

आयुष्यात दोघांनीही एकत्र राहण्याचा विचार केला होता. परंतू कुटुंबीयांच्या विरोधामूळे राजु आणि सलोनीचे स्वप्न पुर्ण होणार नव्हते. सदर घटनेच्या काही महिण्यांपूर्वी लग्न करण्याच्या निर्धाराने दोघेही पळून गेले होते. परंतू सलोनीचे वय विवाहायोग्य न झाल्याने दोघांनाही घरी परत यावे लागले होते. दरम्यान राजु आणि सलोनी लग्न करण्यासाठी पळुन गेल्याची चर्चा गांवात पसरताच सलोनीच्या कुटूंबियांनी तिच्यावर पाळत ठेवली होती. तीच्या पालकांचा त्यांच्या प्रेमाला विरोध असल्यामूळे आपले प्रेम यशस्वी होईल. याबाबत राजु आणि सलोनीला विश्वास नव्हता. परंतु साथ जियेंगे साथ मरेंगेच्या आणाभाका घेतलेले राजु आणि सलोनी एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते.

 

आपल्या लग्नास विरोध होत असेल तर जीवन जगण्यात काहीच अर्थ नाही असे ठरवुन दोघांनीही जीवन संपविण्याा निर्धार केला. घटना उघडकिस येण्याच्या दहा ते बारा दिवसांपूर्वी सलोनी आजीला बाहेर जावुन येते असे सांगून घराबाहेर पडली ती कायमचीच. घराबाहेर पडलेल्या सलोनीला घेवून प्रियकर राजु आत्राम होंडा शाईन क्र. एमएच-३४-एजे-५८८० ने मूल तालुक्यातील झोपला मारोती म्हणून प्रसिध्द असलेल्या देवस्थानकडे आले, लग्नास कुटूंबियाचा विरोध असल्याने भविष्यात आपले एकत्रीत येणे शक्य नाही, असे ठरवुन जीवन संपविण्याचा निर्णय घेतला असावा, आणलेली दुचाकी मार्गावरचं ठेवून मार्गापासून अर्धा कि.मी. आत जंगलात जावून दोघांनीही गळफास लावून जीवन संपविले असावे. असे घटनास्थळावरील पुराव्यावरून सकृत दर्शनी दिसून आल्याचे सांगण्यात आले.

 

सदर प्रकरणाची माहिती रामणगट्टा येथे मिळताच सर्वत्र शोककळा व हळहळ व्यक्त केली जात आहे.प्रकरणाचा तपास ठाणेदार सतिशसिंह राजपुत यांचे मार्गदर्शनात सपोनी मनोज गदादे आणि पोहेकाॅं अकबर पठाण करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here