डॉ. स्मिता कवाडे ठरल्या यावर्षीच्या मिसेस वेस्ट इंडिया

0
519

डॉ. स्मिता कवाडे ठरल्या यावर्षीच्या मिसेस वेस्ट इंडिया

विदर्भाच्या शिरपेचात नवा मान;सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव

आशिष गजभिये
चिमूर.

या वर्षीच्या मिसेस वेस्ट इंडिया सिजन तीन च्या अंतिम फेरीत नागपूरच्या डॉक्टर सौ.स्मिता कवाडे(मोहोड) यांनी मिस. ब्युटी विथ प्रप्रोज हा किताब मिळवला असून विदर्भाच्या शिरपेचात नवा मनाचा तुरा मिळवला आहे. त्यांच्या या यशप्राप्तीच सर्वत्र कौतूक होत असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू आहे.

नागपूर येथिल मेयो रुग्णालयात वैद्यकीय पदवुत्तर पदवीचे शिक्षण घेणाऱ्या डॉ.सौ.स्मिता मनीष कवाडे यांनी आपला वैद्यकीय वसा जपत या वर्षीच्या मिसेस वेस्ट इंडिया या स्पर्धेच्या सिजन तीन मध्ये २० ते २६ वर्ष वयोगटात सहभाग घेतला होता. त्यांच्यासमोर महाराष्ट्र, गुजरात,गोवा, कर्नाटक अश्या विविध राज्याचं प्रतिनिधित्व करणाऱ्या ४७ महिलांचं आव्हान होत. या स्पर्धेत सर्वांना मागे सारत नागपूरच्या डॉ.स्मिता कवाडे यांनी मिस.ब्युटी विथ प्रपोस किताब पटकावला सोबतच त्यांना विशेष वेशभूषेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.त्यांच्या या यशप्राप्तीने विदर्भाच्या शिरपेचात नव्या मानाचा तुरा रोवला गेला आहे.

मूळच्या जळगाव येथील असलेल्या डा. स्मिता यांचा विवाह नागपूर येथील प्रसिद्ध डॉक्टर मनीष कवाडे यांच्याशी झाला.असून शालेय जीवनापासून त्यांनी विविध स्पर्धा आपल्या नावी केल्या आहेत.कोविड-१९ च्या विषाणूजन्य आजाराच्या प्रादुर्भावात त्यांनी केलेल्या विशेष कार्याची दखल फहेत इंडियन मेडिकल असोशियनने कोरोना योद्धा म्हणून त्यांचा सन्मान केला आहे. त्यांनी त्यांच्या या यशाचं श्रेय दिवा पेंटटसच्या मिस.अंजना,कार्ल मस्कारिन्स , डॉ.शर्मिला राऊत,पती डॉ.मनीष कवाडे व कुटुंबियांना दिले आहे. त्यांच्या या यशप्राप्तीसाठी सर्व स्तरावरून कौतुक होत असून अभिनदंनाचा वर्षाव सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here