आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते वाताणुकुलीत शव वाहीकेचे लोकार्पण

0
404

आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते वाताणुकुलीत शव वाहीकेचे लोकार्पण

सिंधी पंचायत कमेटीला सुपूर्त करण्यात आली शव वाहीका

 

आमदार निधीतून १७ लक्ष रुपये खर्च करुन खरेदी करण्यात आलेल्या शव वाहीकेचे आज आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. त्यानंतर सदर शववाहीका सिंधी पंचायत कमेटीला सुपूर्त करण्यात आली.

या कार्यक्रमाला सिंधी पंचायत कमीटीचे अध्यक्ष ज्ञानचंद टहलियानी, सचिव अशोक हासानी माजी नगर सेवक बलराम डोडाणी, राजकुमार लेखवाणी, राजू पंजाबी, मदनलाल चंदनानी, किशोर मोटवानी, अनिल अडवानी, गणेश आसवानी, रवि चिमनानी, संजय लेखवानी, लालचंद् पंजवानी, यांच्यासह यंग चांदा ब्रिगेडचे युवक अध्यक्ष कलाकार मल्लारप, महिला विभागाच्या शहर संघटिका वंदना हातगावकर, आदिवासी विभागाचे जिल्हाध्यक्ष जितेश कुळमेथे, विद्यार्थी विभागाचे शहराध्यक्ष अजय दुर्गे, विजया बच्छाव, स्मिता डोणारकर, सविता दडारे यांच्यासह यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

चंद्रपूरात एकही वाताणूकुलीत शित पेटी उपलब्ध असलेली शव वाहीका सेवेत नसल्याने प्रेत दुरवरुन आणायचे असल्यास मोठी निर्माण होत होती. त्यामूळे सदर व्यवस्था उपलब्ध असलेली शव वाहिका उपलब्ध करुन देण्यात यावी अशी मागणी सिंधी पंचायत कमिटीच्या वतीने आमदार किशोर जोरगेवार यांना करण्यात आली होती. या मागणीची तात्काळ दखल घेत सदर शव वाहिकेसाठी त्यांनी आमदार निधीतून १७ लक्ष रुपयांचा निधी मंजूर केला. या निधीतून उपलब्घ करण्यात आलेल्या या शव वाहिकेचे आज आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते विधीवत लोकार्पण करण्यात आले.

सदर शववाहिकेची मागणी सिंधी समाजाच्या वतीने करण्यात आली होती. त्यांची ही मागणी पूर्ण करता आली याचे समाधान आहे. विधानसभा क्षेत्राचा विकास होत असतांना तो सर्व समावेशक असला पाहिजे यावर माझा भर असल्याचे ते यावेळी म्हणाले सदर शवाहिकेत शितपेठी उपलब्ध असल्याने आता शव दुरवरुन चंद्रपूरात आणण्याची अडचण दुर झाली आहे. शववाहिका उपलब्ध करुन दिल्या बदल सिंधी समाज कमेटीच्या वतीनेही आमदार किशोर जोरगेवार यांचे आभार मानण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here