शॉर्ट्स सर्किट मुळे लागलेल्या आगीत फूट वेअर शॉप जळून खाक

0
548

शॉर्ट्स सर्किट मुळे लागलेल्या आगीत फूट वेअर शॉप जळून खाक

वणी/यवतमाळ, मनोज नवले (१६ ऑक्टो. ) : आज पहाटेच्या सुमारास तहसील कार्यालय वणी परिसरात असलेले एजाज शेख चे दुकानात अचानक शॉर्ट्स सर्किट मुळे फूट वेअर शॉप ला आग लागली. त्यामुळे दुकान हे पूर्णतः जळून गेले. सदर दुकानातील सर्व चप्पला जळुन खाक झाल्या. ही बाब नगरपरिषदेला कळताच त्यांनी तात्काळ अग्निशामक ला बोलावून आगीला काबूत केले.

परंतु मोठ्या प्रमाणात आग लागल्याने पुर्णता व्यापाऱ्याचे नुकसान झाले दुकान मालक तथा संपुर्ण परीवार शोक व्यक्त करीत आहे.

एजाज शेख यांचे दुकानात एकंदरीत 2,50,000 पर्यंतच्या माल भरून होता. संपुर्ण माल आगित भस्म झाला. तसेच त्या दुकानाला लागुनच अरुण ढेंगळे यांचे दुकान बेल्ट, चश्मा, पट्टे यांचे असुन ते दुकान लागुनच असल्यामुळे ते पण जळुन गेले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here