वंचित बहुजन आघाडीचा स्तुत्य उपक्रम

0
565

वंचित बहुजन आघाडीचा स्तुत्य उपक्रम

वरोरा : आज दि.10 मे 2021 श्रध्देय बाळासाहेब तथा प्रकाश यशवंत आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या जन्मदिवसाचे अर्थात वाढदिवसाचे औचित्य साधुन, रंजले, गांजले, शोषित, पिडीत यांच्या सेवेसाठी या देशात एक वंचितांची जबरदस्त संघटना उभी रहावी म्हणून एड. बाळासाहेब आंबेडकरानी या संघटनेची स्थापना केली आहे.

एड. बाळासाहेब आंबेडकरांच्या वाढदिवसाचे निमित्त साधुन या उदात्त हेतुने उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे रुग्णांना सकस आहार म्हणून त्या संपूर्ण आजारी रुग्णांना फळाचे वाटप करण्यात आले आहेत.

वरोरा येथील वंचित बहुजन आघाडीचे जेष्ठ कार्यकर्ते आदरनिय रामाजी हस्ते साहेब, प्रा. पुरानिक गोंगले साहेब, वंचित बहुजन महिला आघाडीच्या अध्यक्षा आद. वंदनाताई मुन, वंचित बहुजन आघाडीचे सक्रीय कार्यकर्ते आद. ज्ञानेश्वरभाऊ खांडेकर, चंद्रपूर जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्षा आद. कविताई गौरकर, आद. बाबुरावजी गायकवाड गुरुजी, आद. रमेशजी टिपले गुरुजी, आद. राहुलभाऊ गौरकर, आद. शिलाताई धोटे इत्यादींच्या हस्ते फळे वाटत करण्यात आले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here