वंचित बहुजन युवा आघाडी तथा भीमशक्ती युवा ग्रुपच्या वतीने रक्तदान शिबीर संपन्न

0
596

वंचित बहुजन युवा आघाडी तथा भीमशक्ती युवा ग्रुपच्या वतीने रक्तदान शिबीर संपन्न

विसापूर (चंद्रपूर) किरण घाटे : राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, धर्मवीर संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त आणि बहुजनाचे हृदयसम्राट वंचित बहुजन आघाडी चे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून दि. १० मे ला विसापूर येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यांत आले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून वंचित बहुजन आघाडी चे विदर्भ संयोजक राजुभाऊ झोडे उपस्थित हाेते. संपत कोरडे स्वप्नील सोनटक्के,सिद्धांत पुणेकर, सचिन पुणेकर, आकाश पाझारे, स्वयमदीप पारेकर, गुंजन वानखडे, सचिन कौरासे, प्रथम दुपारे, फारूक शेख व इतर सर्व कार्यकर्त्यांनी रक्तदान शिबिर यशस्वी करण्यांस अथक परिश्रम घेतले .रक्तदान शिबिराला चंद्रपूर येथील शासकीय रुग्णालय रक्तकेंद्र विभागाचे पंकज पवार, अमोल जिद्देवार, रोशन भोयर, लक्ष्मण नगराळे, रूपेश घुमे प्रामुख्याने हजर हाेते .या वेळी रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here