लहान मुलाला वाचवण्याच्या नादात युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू

0
744

लहान मुलाला वाचवण्याच्या नादात युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू

गडचांदूर जवळील अमलनाला धरण येथे वेस्टवेअर चा आनंद लुटण्याकरिता मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असल्यामुळे मोठी गर्दी होत असते. त्यातच लहान दोन मुलांना वाचवण्याच्या नादामध्ये वेस्टवेअरच्या पाण्यात बुडून चंद्रपूर येथील विठ्ठल मंदिर वार्ड रहिवासी विनायक भानुदास चट्टे या युवकाचा मृत्यू झाला. उद्याला त्याचा वाढदिवस असल्यामुळे आनंद घेण्याकरिता परिवारासह मित्रांसोबत तो अमलनाला वेस्टवेअर ला आला होता.
अमलनाला वेस्टवेअर एका युवकाचा बुडून मृत्यू आता तरी प्रशासनानी लक्ष देण्याची गरज

अमलनाला वेस्टवेअर पाण्यात गोलू चट्टे (२४)रा.विठ्ठल मंदिर वार्ड, चंद्रपूर यांचा बुडून मुत्यु,वेस्टवेअरचे दृश्य पाहण्यासाठी गेलेल्या एका युवकाचा बुडून मृत्यू. मिळालेल्या माहितीनुसार चंद्रपूर येथून काही कुटुंब पर्यटन पर्यटनाचा आस्वाद घेण्यासाठी यास पर्यटन ठिकाणी आले होते. दोन लहान मुले बुडाले असता त्यांना वाचविण्याच्या बेतात त्या युवकांचा बळी गेला
गडचांदूर शहरापासून अवघ्या चार किमीच्या अंतरावर असलेल्या माणिकगड पहाडाच्या पायथ्याशी निसर्गाच्या सानिध्यात वसलेल्या अंमलनाला धरणाच्या पाण्याची पातळीत वाढ झाल्याने येथील आकर्षक,नैसर्गिक,मनमोहक वातावरणाचा अस्वाद घेण्यासाठी परिसरातील पर्यटकांची गर्दी वाढल्याचे चित्र आहे.येथील वेस्टवेअर वरून वाहणारा पाणी पर्यटकांची गर्दी येथे होत असते .ह्या ठिकाणीं प्रत्येक वर्षी एक ना एक जीव जातो पण या ठिकाणी एकही सुरक्षा रक्षक नेमला जात नाही .दूर दूर वरून या ठिकाणी पर्यटक येतात .पण या ठिकाणी प्रशासनाचा निष्काळजीपणा दिसून येतो. नागरिकांची रेलचेल पहायला मिळत आहे.याच पार्श्वभूमीवर याठिकाणी सुद्धा दररोज शेकडो पर्यटक भेट देऊन नैसर्गिक दृश्यांचे मनसोक्त आनंद लुटताना दिसत आहे.याठिकाणी येणारे पर्यटक विशेषतः तरुणाईच्या उत्साह वाखाणण्याजोगा असून यांच्या आनंदावर विरजण पडु नये यासाठी येथे पोलीस बंदोबस्त ठेवण्यात यावा अशी मागणी यानिमित्ताने करण्यात आली होती. पण पुन्हा एकदा एका युवकांचा नाहक बळी गेला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here