साखरी येथील एका युवकाचा सर्पदंशाने मृत्यू

0
391

साखरी येथील एका युवकाचा सर्पदंशाने मृत्यू

 

चंद्रपूर/सावली  (राकेश गोलपल्लीवार):-
सावली तालुक्यातील साखरी येथील संदीप लालाजी शेट्ये वय 33 वर्षे यांचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना(दि.८) आज सकाळी घडली.
साप चावल्यानंतर त्याच्या लक्षात न आल्याने होणारी कमजोरी अशीच असू शकते या भरवशावर राहल्यामुळे विष शरीरात पसरून सदर व्यक्ती मरण पावला.
दरवर्षी शेतीची कामे करीत असताना साप चावल्याच्या घटना घडत असतात.

 

सावधगिरीने लक्ष दिल्यास व इलाज केल्यास जीव वाचू शकतो.पण रोवणी करित असताना साप चावले तरी लक्षात येत नसल्यामुळे अशा घटना घडत असतात.सदर व्यक्तीच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती बिकट असल्यामुळे राकेश गड्डमवार माजी सभापती यांनी स्वतच्या वाहनात पी.एम.करिता सावली येथे नेत आहेत.संदीपच्या पश्चात आई, वडील,पत्नी,मुलगा व मुलगी असा आप्त परिवार आहे. कमावता मुलगा गेल्याने कुटुंबावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here