आविस कडून अहेरी नगर पंचायतचा शवयात्रा काढुन निषेध

0
505

आविस कडून अहेरी नगर पंचायतचा शवयात्रा काढुन निषेध

जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या नेत्रुत्वात

अहेरी:✍️सुखसागर झाडे गडचिरोली

अहेरी राजनगरीतील रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले असुन सदर खड्याची डागडुजी करण्यात नगर पंचायत कडून दुर्लक्ष केले जात आहे.

अहेरी नगरीत रस्ते,नाली बांधकाम,घरकुल आदि समस्या आवासुन उभे आहेत मात्र नगर पंचायत प्रशासनकडून दुर्लक्ष केल्या जात आहे,यांबाबत आदीवासी विध्यार्थी सघटनेकडून नगर पंचायत प्रशासनला व अप्पर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले मात्र याकडे लक्ष देण्यात आले नाही.

अहेरी नगरातील रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले असताना उपयोजना करण्यात आले नाही. त्यामुळे अहेरी नगर पंचायतच्या निष्क्रिय कारभारा विरुद्ध आदिवासी विध्यार्थी संघाकडून नगर पंचायतच्या शवयात्रा कडून अहेरी नगरीत मिरवणूक काळण्यात आली. रस्त्यांवरील खड्ड्यात छुरी टाकून खड्डे बूजवत नगर पंचायतचा निषेध करण्यात आला.

यावेळी अहेरी पंचायत समितीचे सभापती भास्कर तलांडे,जि.प.सदस्य अजय

नैताम,जि.प.सदस्या कु.सुनीता कुसनाके,उपसभापती सौ.गीताताई चालुरकर,प.स.सदस्या सौ.सुरेखा आलाम,खमनचेरूचे सरपंच सायलू मडावी,पेरमिलीच्या सरपंचा सौ.किरण कोरेत, आविस शहर अध्यक्ष प्रशांत गोडसेलवार, एटापलीचे आविस सचिव प्रज्वल नागूलवार,माजी सरपंच प्रमोद आत्राम,माजी उपसरपंच अशोक येलमूले,आलापलीचे माजी सरपंच दिलीप गंजिवार,ग्राम पंचायत सदस्या सौ,उषाताई आत्राम, मिलिंद अलोने,साईंनाथ औतकर,विलास गलबले,पुनेश कंदीकुरवार,अरफाज शेख,दीपक संगमवार व इतर गावकरी उपस्तीत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here