फिल्टर प्लांट मैदानात जागतिक पर्यावरण दिनाच्या औचित्याने वृक्षारोपण

0
347

फिल्टर प्लांट मैदानात जागतिक पर्यावरण दिनाच्या औचित्याने वृक्षारोपण

 

राजुरा : स्थानिक रामपूर येथील फिल्टर प्लांट मैदानात जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधुन वृक्षारोपण करण्यात आले.

आज पर्यावरण हा गंभीर मुद्दा बनला असून रामपूर क्षेत्रात लोकवस्ती वाढत आहे. त्यात चिमुकल्यांचे भविष्य सुखकर होऊन शुद्ध हवा मिळावी, निरोगी-सुदृढ आरोग्य लाभावे. छोट्या मुलांना वृक्ष संवर्धनाची ओढ निर्माण व्हावी. या उद्देशाने ग्रा. प. सदस्य लता डकरे व अनिता आडे यांच्या संकल्पाने चिमुकल्या कडून वृक्षारोपन करण्यात आले.

सदर मुलांनीही आवड दाखवत वृक्षारोपन केले. तसेच वृक्ष संवर्धन ही करण्याचा निश्चय केला. या कार्यक्रमात अक्षय डकरे, कोमल कावडे, उन्नती आडे, तुंबेकर, मुसळे, मुतराज कोळी, आडे यांचे सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here