लोणी खुर्द सोसायटी मध्ये वीस वर्षानंतर सत्तांतर

0
1361

लोणी खुर्द सोसायटी मध्ये वीस वर्षानंतर सत्तांतर

राधाकृष्ण विखे यांना पुन्हा पराभवाचा धक्का

काँग्रेस, राष्ट्रवादी प्रणित युवा परिवर्तन मंडळाच्या 13 पैकी 13 जागा विजयी

 

अहमदनगर
संगमनेर (६/६/२०२२)
(प्रतिनिधी ज्ञानेश्वर गायकर पाटील)
राहता तालुक्यातील लोणी खुर्द येथील आर्थिक दृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या लोणी खुर्द विविध कार्यकारी सोसायटी च्या झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत माजी आमदार स्वर्गीय चंद्रभान दादा घोगरे गटाच्या व सरपंच जनार्धन घोगरे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस ,राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित युवा परिवर्तन मंडळाने 13 पैकी 13 जागा जिंकत सत्ता परिवर्तन केले आहे. काल सायंकाळी झालेल्या मतमोजणी नंतर हे चित्र स्पष्ट झाले. तर माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे यांच्या नेतृत्वाखालील जनसेवा मंडळाला वीस वर्षानंतर सोसायटी मध्ये ग्रामपंचायत पाठोपाठ सत्तेतून पायउतार व्हावे लागले. या निकालाने लोणी व प्रवरा विभागातून स्वागत केले जात असून , काल रात्री लोणी गावात व प्रवरा परिसरात मोठी विजयी आभार सभा घेण्यात आली व गुलालाची उधळण करण्यात आली. एकूण 1037 मतदारांनी मतदान प्रक्रियेत सहभाग नोंदवला.

‘लोणी खुर्द सेवा संस्थेत ऐतिहासिक विजय संपादन केल्याबद्दल विखे पाटील फौंडेशन चे अध्यक्ष डॉ. अशोक विखे पाटील यांच्या वतीने लिटील फ्लॉवर स्कुल चे उपप्राचार्य देशपांडे, प्रशासकीय आधीकारी डी.जी.पठारे यांच्याकडुन सरपंच जनार्दन घोगरे व विजयी उमेदवाराचा सत्कार ही करण्यात आला, तरुणांनी या निवडणुकीत मोठा सहभाग नोंदवला होता, व सभेत ही त्यांचा सहभाग उल्लेखनीय होता.’

कर्जदार मतदारसंघातून जनार्दन घोगरे ,राजेंद्र आहेर, कैलास आहेर, मंगेश घोगरे ,बाबासाहेब मापारी ,भास्कर आहेर ,विनायक घोगरे, महेश आहेर, अनुसूचित जाती जमाती मध्ये महिला राखीव शांता आहेर, मिराबाई घोगरे ,इतर मागास प्रवर्गात जनार्दन घोगरे, भटक्या विमुक्त मधून शंकर राऊत हे उमेदवार विजयी झाले.

युवा परिवर्तन मंडळाचे मार्गदर्शक एकनाथ चंद्रभान घोगरे पाटील ,तसेच ज्येष्ठ नेते आबासाहेब जनार्दन आहेर पाटील यांच्या मार्गदर्शननुसार युवा परिवर्तनचे, नेतृत्व जनार्दन चंद्रभान घोगरे पाटील यांनी केले.

भविष्यात राधाकृष्ण विखे पाटील यांना मोठा राजकीय विरोधक तयार होत असून, २०२४ ची निवडणूक राजकीय समीकरणे ही बदलू शकते. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी कडून जोरदार मोर्चे बांधणी चालू असून, बाळासाहेब थोरात, डॉक्टर सुधीर तांबे , राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष फाळके , कपिल पवार हे घडामोडींवर लक्ष ठेऊन आहेत. कालच्या दुसऱ्या पराभवाने माजी मंत्री राधाकृष्ण विखे सावध झाले असून त्यांनी ही आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती बाबत आढावा बैठका घ्येण्याचे काम चालू केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here