संविधान बचाव आंदोलन संघटनव्दारे अनुप्रवर्तन दिनाचा कार्यक्रम संपन्न!
चंद्रपूर । किरण घाटे

चंद्रपूरातील संविधान बचाव आंदोलन(राष्ट्रीय सामाजिक संघटन)च्या वतीने काल शुक्रवारला 64 वा अनुप्रवर्तन दिनाचा कार्यक्रम पार पडला. या दिनाचे औचित्य साधून स्थानिक बाबूपेठ वार्ड येथील तथागत बुद्ध विहारात फळ वाटपांचा तसेच सामाजिक प्रबाेधनाचा कार्यक्रम घेण्यात आला .आंबेडकर अनुयांनी शारीरिक अंतर व काेराेनाचे सर्व नियम पाळत या वेळी बाबासाहेबांना वंदन केले . सदरहु कार्यक्रमाला संघटनेचे अध्यक्ष तथा मुख्य मार्गदर्शक मेघराज राऊत, राष्ट्रीय सचिव धिरज निकाळजे, राष्ट्रीय महासचिव पपीताताई जुनघरे, विदर्भ उपाध्यक्षा कल्पना अलोने, भाऊराव दुयोँधन, सुनंदा दुयोँधन, रामचंद्र सोनटके,वैजन्ती मुन, वंदना मडकवार, रसिका उराडे, मारोती मडावी तसेच असंख्य धम्म बांधव व धम्म भगीनी उपस्थितीत हाेत्या.या वर्षि शहरातील काेराेना संकटामुळे चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनाचा मुख्य कार्यक्रम रद्द केला हाेता.