भुताने छेडलंय या…आक्सापूरच्या शासकीय विश्रामगृहात काय सुरू आहे ?

0
807

भुताने छेडलंय या…आक्सापूरच्या शासकीय विश्रामगृहात काय सुरू आहे ?

गावात खमंग चर्चा

घडविलेल्या प्रकारामागे हात कुणाचा ?

 

 

शासकीय विश्रामगृहाला देशाच्या महामहीम राष्ट्रपती यांचे निवासस्थान म्हणून संबोधल्या जाते.प्राचीन काळापासून या हाऊसचे अनन्य साधारण महत्व आहे.भटक्या व गरजूंना हक्काचा निवारा या माध्यमातून मिळाला.त्याचवेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अाक्सापूर येथील रेस्ट हाउसकडून विभागाच्या हेतुला हरताळ फासल्या जात आहे.ही पब्लिक प्रापर्टी अलीकडे वयक्तिक मालमत्ता बनत चालली आहे.नियम डावलून मर्जीतील लोकांना रेस्ट हाऊसचा वापर करू दिल्या जात आहे.या वास्तूचा लाभ घेणाऱ्याची कुठे नोंद ठेवली जात नसतांना या शासकीय निवा-‍याबाबत काही दिवसांपासून विचित्र आणि उलट-सुलट चर्चा सुद्धा ऐकायला मिळत आहेत.इथे भूत वास्तव्याला असल्याची चर्चा असून हा प्रकार मुद्दाम घडविला जात आहे की यामागे कुणाचा हात आहे,याचा उलगडा होण्याची गरज आहे.

गोंडपिंपरी तालुक्यातील आक्सापूर गावात सार्वजनिक बांधकाम विभागातर्गत शासकीय विश्रामगृह कार्यरत आहे.हे विश्रामगृह फार जुने असून याला अनन्य साधारण महत्व आहे.पोंभुर्णा व गोंडपिपरी तालुक्याच्या सीमेवर हे विश्रामगृह असल्यामुळे याचा दोन्ही तालुक्यातील जनता आणि चंद्रपूर-अहेरी या राष्ट्रीय मार्गावरील प्रवाशांना लाभ घेता येईल.दरम्यान अनेक वर्षांपर्यंत हे विश्रामगृह कुलूपबंद राहिले.सार्वजनिक बांधकाम विभागाने देखील याकडे पूरते दुर्लक्षच केले.केवळ वार्षिक देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली काही प्रमाणात निधी या विश्रामगृहासाठी खर्च केल्याचे दाखविण्यात आले.मात्र बऱ्याच अंशी प्रत्यक्षात कामच झाले नाही.झाले तरी अंदाजपत्रकीय तरतुदीला बाजूला सारून आजपर्यंत काम होत आले.अशावेळी येथील उपविभागीय अभियंता रमेश शंभरकर यांनी स्वतः पुढाकार घेऊन सदर विश्रामगृहाच्या नूतनीकरणाचे काम हाती घेतले.अगदी सुविधा आणि साहित्यांनी परिपूर्ण विश्रामगृह त्यांच्या काळात बनले.या विश्रामगृहाचा वापर पुढील काळासाठी जनता व प्रवाशांना होईल हा त्यामागील उद्देश होता.मात्र बांधकाम विभागाच्या या उद्देशाला हरताळ फासल्या जात असल्याचा प्रकार बऱ्याच दिवसांपासून सुरू असल्याचे दिसून येत आहे.राजकीय पार्टीच्या जेवणावळी या विश्रामगृहात चालतात.खाजगी कामासाठी वास्तूचा उपयोग होत असून मर्जीतील लोकांसाठीच विश्रामगृहाची सुविधा लाभत असल्याचे देखील बोलल्या जात आहे.बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना अंधारात ठेवून येथील कामकाज चालत असून स्थानिक अधिकारी मुद्दाम या प्रकाराकडे कानाडोळा करीत असल्याचे दिसत आहे.अनेक ओल्या पार्ट्या सुद्धा आतापर्यंत या विश्रामगृहात पार पडल्याच्या चर्चा गावात सुरू आहेत.या शासकीय इमारतीचा निवारा म्हणून वापर करणाऱ्या कुठल्याच व्यक्तीची नोंद विभागाकडे नाही.अशावेळी आत्तापर्यंत अनेक वाटसरुनी या विश्रामगृहाचा लाभ घेतला असता अचानक या वास्तूबद्दल विचित्र आणि उलट-सुलट चर्चेला पेव फुटले आहे.विश्रामगृहात भुताचे वास्तव्य आहे.रात्री मुक्कामी व्यक्तीला भुताकडून छेडल्या जात असल्याची चर्चा परिसरात रंगू लागली आहे.विश्रामगृहाचे नुतनीकरण होऊन ते पूर्ववत सुरू झाले.याला दीड ते दोन वर्षाचा कालावधी लोटला.एवढ्या दिवसात अशी कुठलीच चर्चा कानावर आली नाही मात्र अचानक काही दिवसापासून हा प्रकार सुरू झाल्यानंतर आता मुद्दामच अशी चर्चा घडवून शासकीय विश्रामगृहाविषयी कलुषित भावना निर्माण करण्याचा प्रकार चालविला जात आहे.अाक्सापूर गावातच ही चर्चा असून यात कुणी गावकरी किवा विश्रामगृहाच्या संबंधित व्यक्तीचाच हात तर नाही,अशी शंका उपस्थित होत आहे.त्यामागील कारण मिमांसा तपासण्याची गरज सध्या निर्माण झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here