‘नगरपरिषद राजुरा’ निवडणूक प्रभागनिहाय आरक्षण सोडत जाहीर…

0
551

‘नगरपरिषद राजुरा’  निवडणूक प्रभागनिहाय आरक्षण सोडत जाहीर…

 

राजुरा, 28 जुलै : नगरपरिषद राजुरा निवडणूक उमेदवारीची प्रभागनिहाय आरक्षण सोडत आज जाहीर करण्यात आली.

नगरपरिषदेच्या 10 प्रभागातील 21 जागांसाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम आज नगरपरिषद येथे पार पडला. यात प्रभाग क्रमांक 1 – ‘अ’ करिता नामाप्र महिला व ‘ब’ करिता सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 2 – ‘अ’ करिता अनुसूचित जाती महिला व ‘ब’ करिता सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 3 – ‘अ’ अनुसूचित जाती सर्वसाधारण, ‘ब’ करिता नामाप्र महिला तर ‘क’ करिता सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक 4 – ‘अ’ करिता नामाप्र व ‘ब’ करिता सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक 5 – ‘अ’ अनुसूचित जमाती सर्वसाधारण व ‘ब’ करिता सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक 6 – ‘अ’ मध्ये नामाप्र व ‘ब’ मध्ये सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक 7 – ‘अ’ अनुसूचित जमाती महिला व ‘ब’ सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 8 – ‘अ’ सर्वसाधारण महिला व ‘ब’ सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 9 – ‘अ’ करिता नामाप्र महिला व ‘ब’ करिता सर्वसाधारण तर प्रभाग क्रमांक 10 – ‘अ’ करिता अनुसूचित जाती महिला व ‘ब’ करिता सर्वसाधारण अशाप्रकारे संवर्ग निहाय आरक्षण सोडत जाहीर करण्यात आले.

 

आरक्षण सोडत जाहीर झाल्यामुळे निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला असून इच्छुक उमेदवारांत आता चुरस निर्माण झाली आहे. निवडणुकीच्या पायबांधणीला वेग आल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here