गावातील लसीकरण शंभर टक्के करण्यासाठी सामाजिक संस्था व युवकांनी पुढाकार घ्यावा

0
460

गावातील लसीकरण शंभर टक्के करण्यासाठी सामाजिक संस्था व युवकांनी पुढाकार घ्यावा

बंधू , भगिनींनो गरज आहे शारीरिक दुरी बाळगण्याची सामाजिक दुरी नव्हे? – आमदार डॉ देवराव होळी!

सुखसागर झाडे, चामोर्शी : कोविड-19 या वायरस ने संपूर्ण जगातच नाही तर आपल्या गावात किंबहुना आपल्या कुटुंबात, आपल्या नात्यात शिरकाव केल्याचे दिसून येत आहे. या विषाणू पासून सुरक्षितता म्हणुन आपल्या सोशल डिस्टन्सिन्ग पाळायला संगितले. परंतु अनेक ठिकाणी असे दिसुन येते की, एखाद्याला कोरोनां ची लागण झाली तर त्याच्या संपूर्ण कुटुंबालाच बहिष्कृत करण्यात येते. त्याच्या कुटुंबाला वाडीत टाकल्या सारखे केले जाते. मान्य आहे या वायरस चा प्रकोप महाभयंकर आहे. परंतु आपल्या शेजाऱ्यांप्रती आपल्या नात्यातील लोकांविषयी इतकी असंवेदनशीलता बघुन मन सुन्न होतं.
खरे तर अशा प्रसंगी त्या बाधिताला, त्याच्या कुटुंबाला भावनिक आधाराची गरज असते. एरवी घरात काहीही गोडधोड शिजले की वाटीभर शेजाऱ्यांला देणारे आम्ही त्याच शेजाऱ्यांला असे बहिष्कृत करतो.
खरचं आपण असे आहोत कां?की यां आजाराला घाबरून आमच्यातील संवेदनशीलता मेली आहे. नाही ? मुळात नाहीच आपण तसे. पण जे ऐकतो, जे बघतो आणि कृती करतो. पण थांबा स्वतःला थोडं वेळ द्या आणि प्रश्न करा. कोजागिरीचा उत्सव ज्यां शेजाऱ्यांच्या अनुपस्थित करायचे टाळतो त्याचं शेजाऱ्यांला आज संकटाच्या समयी असे दूर करतो. त्यांना तर आता खरी गरज आहे. आपल्या आधाराची, आपल्या सहानुभूतीची,आपल्या मदतीची. आणि आपलीही गरज आहे. आपला शेजारधर्म पडण्याची. मित्रांनो, यां विषाणू ने काही कुटुंबंच्या कुटुंबं बाधित केलेत. आणि आपण सोशल दुरी पळतोय बंधू भगिनींनो गरज आहे शारिरीक ,दुरी बाळगण्याची सामजिक दुरी नव्हे ?
आपल्या शेजारी- पाजारी किंव्हा आपल्या नात्यात कुणी कोविड-19 चा बाधित असेल तर कृपया त्यांना दूर करू नका. त्यांना भावनिक आधार द्या. सर्व नियमांचे पालन करा. त्यांना फोन वरून शारिरीक दुरी ठेवुन भेट घ्या. त्यांना आपल्या आधाराची
गरज आहे हे समजुन घ्या. ते बाधित झाले म्हणजे त्यांना वाडीत टाकलेच पाहिजे असे नाही. त्यांना सहकार्य करा. आपला भावनिक आधार बघुन यां आजाराच्या भितीतून बाहेर निघण्यास त्यांना मदत होईल.
हे सर्व करीत असतांना आपण स्वतः स्वतःची काळजी घ्यावी. व राज्य सरकारने तालुका स्तरापासून गाव स्तरा पर्यंत लसीकरण मोहीम सुरू केले आहे. या लसीकरणाच्या कार्यास सर्वांनी सहकार्य करावे व आपण स्वतः लसीकरण करा आणि इतरांना सुद्धा लसीकरण करण्यासाठी प्रवृत करावे या करिता गावातील युवक युवतींनी पुढाकार घ्यावा व सामाजिक संस्थांनी एकत्र येऊन या कामाकरीता मदत करावे व नागरिकांमध्ये लसीकरण बाबत गैरसमज दूर करावे असे आव्हान गडचिरोली विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ. देवराव होळी यांनी केले. मी स्वतः लसीकरणाचा दुसरा डोज घेतला आहे मी स्वस्थ आहे, स्वतः सुरक्षित रहा आणि इतरांना सुद्धा सुरक्षित करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here