रक्तदाता कसा असावा

0
440

रक्तदाता कसा असावा

 

 

चंद्रपूर, 15 जुलै : काल जितेंद्र मशारकर या रक्तदात्याने विक्रमी 63 व्या वेळी आपल्या मुलाच्या स्वर्गीय चिरंजीव कुशल याच्या सातव्या वाढदिवसानिमित्त रक्तदान केले. या पित्याचे दुर्दैव असं की गेल्या आठ दिवसांपूर्वीच स्वर्गीय चिरंजीव कुशल याचा झोपेत असताना अवघ्या सातव्या वर्षी निधन झाले. दरवेळी मुलाच्या वाढदिवसानिमित्त रक्त करणारा बाप आज मुलाच्या जयंतीनिमित्त रक्तदान करेल असा स्वप्नातही विचार केला नसेल.

आपले आभाळाएवढे दुख बाजूला सारून घरात दुखवटा असून पित्याने थेट रक्त केंद्र गाठले आणि रक्तदान करते झाले. माफक अपेक्षा एकच की एखाद्या दुर्देवी रुग्णाचे रक्ता अभावी प्राण जाऊ नये.

रक्तदात्यांना अजून कसली प्रेरणा पाहिजे , रक्तदात्यांनो रक्तदान केल्याने एखाद्या रुग्णाचे प्राण वाचतात यासारखा असीम आनंद कुठलाच नाही.

रक्तदानाचे अनेक फायदे आहेत हेमोक्रोमेटोसिस हा रक्तामध्ये अतिरिक्त लोहा मुळे होणारा विकार रक्तदानामुळे दूर राहतो रक्तदानामुळे नवीन रक्त पेशींची निर्मिती होते रक्तदानानंतर शरीर लगेच नव्या रक्तपेशींची निर्मिती करते त्यामुळे रक्तदात्याचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते रक्तदानामुळे रक्तातील लोह घटकाचे प्रमाण नियंत्रित झाल्याने कर्करोग होण्याचे जोखीम कमी होते. ठराविक पातळीपर्यंतच रक्तात लोह हवे अन्यथा कर्करोगाला ते कारणीभूत ठरू शकतात. लोहाचे प्रमाण जास्त आरोग्याचे इतर समस्या निर्माण होतात हे संतुलन रक्तदानामुळे राखता येते.

 

रक्तदानामुळे लोहाच्या अतिरिक्त प्रमाण कमी झाल्यामुळे हृदय व यकृताचे आरोग्य राखण्यास मदत होते अनेक जण भरपूर अन्न सेवन करतात त्यातील ठराविक भागच उपयोगी पडतो उर्वरित भागाचा संचय अनारोग्यकारक चरबीचा रुपात यकृत स्वादुपिंड हृदयाच्या वाहिन्यात जमा होऊन त्यांचे आरोग्य धोक्यात येते. रक्तदान ही सोपी आणि अल्पावधीत पार पडणारी प्रक्रिया आहे त्याचे कोणतेही दुष्परिणाम होत नाही. तेव्हा रक्तदात्यांनो पुढे यावे आणि रक्तदान करावे.

“ब्रिद वाक्य – रक्तदान करणे हे एकजुटीचे कार्य आहे. प्रयत्नांमध्ये सामील व्हा आणि जीव वाचवा.”
संजय गावित, समाजसेवा अधिक्षक रक्तकेंद्र शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here