गडचांदूर पोलिसांनी घरफोडी करणाऱ्या टोळीस केले गजाआड

0
415

गडचांदूर पोलिसांनी घरफोडी करणाऱ्या टोळीस केले गजाआड

 

गडचांदूर/कोरपना : गडचांदूर शहरातील घरफोडी करणाऱ्या चार आरोपींना पोलिसांनी गजाआड केले आहे.

सविस्तर वृत्त असे की, वॉर्ड क्रमांक 5 येथील रहिवासी रमेशचंद्र नारायण भालेराव यांनी त्यांचे घर शेजारी धनंजय घुले कुटुंबासह बाहेर गावी गेले असता 19 मे ते 3 जून दरम्यान त्यांच्या घरात घुसून अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याची तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधाराने पोलिसांनी चौकशी केली असता घुले यांच्या घरातील ओनिडा एल इ डी टीव्ही (रुपये 22 हजार), सीसीटीव्ही कॅमेरा चा डी व्ही आर (8 हजार), एसर कंपनीचा वापरात असलेला जुना लॅपटॉप (7 हजार), एच पी चा लॅपटॉप (8 हजार), पाच व तीन ग्रॅम सोन्याच्या दोन अंगठ्या (24 हजार) असा एकूण 69 हजार रुपयेचा माल चोरीस गेल्याचे उघडकीस आले.

पोलिसांनी तपासात टोळीतील गडचांदूर वॉर्ड क्रमांक 6 येथील मैनुद्दीन मन्सूर आलेख जीलानी (26 वर्ष), माणिकगढ सिमेंट कंपनी क्वार्टर येथील निवास अशोक रॉय (25) या आरोपीचे वडील माणिकगढ सिमेंट ला युनियन लिडर आहेत. वॉर्ड क्रमांक 6 येथील रेल्वे स्टेशन जवळील गजेंद्र उर्फ गज्या बालाप्रसाद ढगे (23), पियुष उर्फ अरुण सोनटक्के (19) या चार आरोपीसह ओनिडा टीव्ही, डी व्ही आर तसेच एच पी लॅपटॉप असा 38 हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला.

सदर आरोपींचा पोलीस कोठडी रिमांड घेण्यात आला असून तपास सुरू आहे. सदर कार्यवाही पोलीस अधिक्षक अरविंद साळवे, अपर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, उपविभागीय पोलीस अधिकारी सुशिलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार सत्यजित आमले, सपोनि प्रमोद शिंदे, नापोशी धर्मराज मुंडे, हेमंत धवणे, इंदल राठोड, पोशी विजय कोटनाके, तिरुपती माने, संदीप थेरे तपास करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here