घुग्घुस शहरात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर पृर्णाकृती पुतळ्याच्या प्रथम वर्धापन व भव्य धम्म संमेलनात नागरिकांची अलोट गर्दी

0
180

घुग्घुस शहरात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर पृर्णाकृती पुतळ्याच्या प्रथम वर्धापन व भव्य धम्म संमेलनात नागरिकांची अलोट गर्दी

“मला अनेक निरोप येतात की, सर हिंदी में बाद करो हमे समज नही आता, अच्छे दिन आयेंगे एवढे हिंदी समजू शकतो, तर माझी हिंदी कळेल.” – डाॅ. राजरत्न आंबेडकर

 

विशेष प्रतिनिधी/पंकज रामटेके
घुग्घुस येथील दि.२६ व २७ जानेवारी २०२४ या दोन दिवसीय भव्य संमेलन बोधिसत्व, विश्वरत्न, भारतीय संविधानाचे शिल्पकार परमपूज्य डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळयाच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त्य विश्वरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसर येथे बौद्ध सर्कल समिती घुग्घुस व नवबौद्ध स्मारक तथा बहुउद्देशीय समिती यांच्यातर्फे आयोजन करण्यात आले. सर्वधर्म समभाव समाज बांधवाची शांतिपूर्णक नागरिकांची अलोट गर्दी झाली.

दि.२६ जानेवारी शुक्रवार सकाळ रोज धम्म सम्मेलनाचे उद्घाटन औरंगाबादचे पूज्यनीय भंते करुणानंद थेरो यांच्या हस्ते संमेलनाचे व प्रमुख उपस्थिती पूज्यनीय भंते धम्मानंद, धम्मबोधी थेरो, श्रध्दारक्खित, संघरतन, रत्नमणि थेरो यांच्या मार्गदर्शनात उद्घाटन करण्यात आले.

तसेच दुपारी डाॅ. राजरत्न आंबेडकर यांनी भव्य धम्म संमेलनात येताना यांचा नविन बसस्थानक शिवाजी चौकातुन लेझीम पथक व सामुहिक रॅली दोन रांगेत काढुन शांतिपूर्वक नारे देत पोलीस स्टेशन समोरील युथ सर्कल घुग्घुस तर्फे शीख धर्माचे व मुस्लीम समुदायचे समाज बांधवांनी त्यांना पुष्पगुच्छ देवुन त्यांचा स्वागत करण्यात आले. तसेच त्यांच्या हस्ते भारतीय संविधान चौक नाव देऊन फित कापून उद्घाटन करण्यात केले. तसेच पुर्णाकृती डॉ. बाबासाहेब आंबेडकर परिसरात भव्य धम्म संमेलनात रॅली पोहचले.

तसेच डाॅ. राजरत्न आंबेडकर साहेब यांनी मार्गदर्शनात म्हटले की, विश्ववंदनीय तथागत सम्यक, सबुध्द बौध्दीस्तव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, शाहु महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, माता रमाई, भिमाई, सावित्रीबाई आणि ज्या-ज्या पुरुषांनी, महा नायकांनी आमच्या हक्कांची, अधिकाराची लढाई, लढरी त्या सर्व महापुरुषांनी व त्या त्रिवायाकांनी मी वंदन करते.

आपण सर्व दिन ७४ वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी आणि त्याच सबोत महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पृर्णाकृती पूतळ्याची वर्धापन दिन प्रथम वर्धापनदिन साजरा करण्यासाठी सगळे ईथे जमा झाले आहोत, त्या अनुशंगाने मी माझ्या वतीने बुध्दीष्ठ सोसायटी इंडीया, भारतीय महासभाचा वतीने आंबेडकर कुटुंबीयांच्या वतीने मी आपल्या सर्वांना प्रजासत्ताक दिनाचा आणि डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचा प्रथम वर्धापनादिनाचा सर्वांना मनोकामना देतो, माझ्या भाषणाला सुरुवात करण्यापूर्वी सर्वाची विनंती करीत इच्छीतो हा कार्यक्रम आवाज इंडियावर प्रदर्शन केला जाणार व दाखवनार आहे, किंवा लॅव्हू सुरु आहे, मला अनेक मैसेज (निरोप) येतात की, सर आप हिंदी में बाद किया करो, हमे समज नही आता, अच्छे दिन आयेंगे येवढे हिंदी समजु शकतो, तो माझी हिंदी तुम्हाला कळेल असे म्हनुन हिंदीत भाषण व मनोगत व्यक्त करण्यात आले.

तसेच सायंकाळी सुप्रसिद्ध विकास राजा यांच्या संगीतमय प्रबोधनाचा कार्यक्रमात अलोट गर्दी तसेच शांतिपूर्वक पार पाडला.

दि. २७ जानेवारी दिवसभर भारतीय संविधान-स्त्रियांच्या सर्वांगीण उत्थानाचा मार्ग, युवकांच्या आर्थिक सक्षमीकरणाचा मार्ग व आंबेडकरी चळवळीमध्ये युवाकांची भुमिका या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच सांयकाळी महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध भिमशाहिर साहेबराव येरेकर यांच्या प्रबोधनाच्या कार्यक्रम उत्साहात समारंभ पार पडला. तसेच भोजनाची व्यवस्था शांतिपूर्वक करण्यात आली होती.

यावेळी व्यवस्थापन समिती, सल्लागार समिती, स्वागत समिती, भोजन व्यवस्था समीती, सजावट समिती, प्रसिद्धी प्रमुख, सदस्यगण तसेच आयोजक बौद्ध सर्कल समिती व नवबौद्ध स्मारक तथा बहुउद्देशीय समिती घुग्घुसच्या वतीने दोन दिवसीय भव्य धम्म संमेलन शांतिपूर्वक पार पडले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here