मुंबई प्रतिनिधी : महेश कदम
माननीय आमदार श्री. कालिदास कोळंबकर साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भव्य आरोग्य शिबिर व कोविड योद्धांचा सन्मान करुन विविध उपक्रम राबविण्यात आले.
जगभरातील कोरोना या संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव लक्षात घेता “कोविड १९” च्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी सोहळे, कार्यक्रम रद्द करण्यात येत आहेत, यामुळे या वर्षीचा १३ नोव्हेंबर २०२० रोजी साहेबांचा वाढदिवस अत्यंत साधेपणाने, कोणताही गाजावाजा न करता सामाजिक भान लक्षात घेऊन नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने मोफत आरोग्य तपासणी शिबिर, रक्तदान, कोविड योद्धा सन्मान व ईतर उपक्रम राबविण्यात आले.

कार्यसम्राट आमदार माननीय श्री. कालिदास कोळंबकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व वडाळा विधानसभा उपाध्यक्ष श्री. जितेंद्र कांबळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण समर्थक, कार्यकर्ताने २२ मार्च २०२० पासुन अन्यदान केले, पोलिस कर्मचारी, बृहन्मुंबई महानगर पालिका कर्मचारी व गरजू लोकांना सहकार्य केले, वेळोवेळी जनतेसाठी आरोग्य तपासणी, फवारणी, औषधोपचार करणे, सेनिटायजर वाटप करणे, मास्क वाटप करणे, विभागात अत्य अवश्यक सेवा, वैकुंठधाम रथ सेवा चालू होते.
पुर्ण ७ महिने ज्यांनी जनसेवा केली त्यांचा कोविड योद्धा सन्मान साहेबांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. तसेच भव्य आरोग्य, रक्तदान शिबिर आमदार साहेबांचा जन हिताचे वैचित्य साधुन हा कार्यक्रम करण्यात आले.
हा कार्यक्रम गुरुवार दिनांक १२ नोव्हेंबर २०२० रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजता, भाजपा जन संपर्क कार्यलय प्रभाग क्रमांक: १९२, दुधवाला चाळ क्रमांक: ०२, काका साहेब गाडगीळ मार्ग, दादर, मुंबई येथे करण्यात आले.
विभागातील नागरिकांनी चांगले प्रतिसाद दिले. रक्तदान शिबिरात अनेक लोकांनी सहभाग घेतला.
या कार्यक्रमात दादर चे वरिष्ठ पोलिस उपनिरीक्षक श्री. दिवाकर शेळके सर आणि संपूर्ण टीम उपस्थित होते, श्री. वीरेंद्र मोहिते सर (वैद्यकीय अधिकारी जी. उत्तर व जी-दक्षिण विभागातील पुर्ण सहकारी उपस्थित होते. समाजसेवक, स्वच्छता कर्मचारी, पत्रकार श्री. महेश कदम यांचा इच्छुक मान सन्मान व कोविड योद्धा प्रमाणपत्र देऊन करण्यात आले. तसेच विजय डगरे, एकनाथ संगम, आमदार गणपत कदम, हर्षदा कांबळे, जितेंद्र कांबळे, मनीषा आंबरसकर, प्रणिता पवार, संदिप तिवरेकर, संतोष शिंदे, आदर्श दुबे, शैलेश यादव, प्रमोद सावंत, राजु सावळा, संदिप जैन, विष्णू सोनावणे व ईतर पदाधिकारी उपस्थित होते. या सर्व कार्यक्रम चे आयोजन श्री. जितेंद्र कांबळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली झाले.
वेळ गंभीर पण योद्धा खंबीर, कोरोनाला हरवुया, देशाला जिंकुया, अंतर ठेवा, मास्क घाला, कोरोना टाळा. असे शेवटी लोकांना संदेश साहेबांनी दिले.