कोरपना तालुका युवक काँग्रेसच्या वतीने केंद्रातील मोदी सरकारकडे रोजगार दो.!!!..मागणीचे तहसीलदार साहेबाना निवेदन

0
339

कोरपना तालुका युवक काँग्रेसच्या वतीने केंद्रातील मोदी सरकारकडे रोजगार दो.!!!..मागणीचे तहसीलदार साहेबाना निवेदन

प्रतिनिधी प्रवीण मेश्राम

आज दि ८/९/२०२० ला युवक काँग्रेस कमिटी कोरपना यांनी केंद्रातील मोदी सरकारकडे रोजगार दो….मागणीचे निवेदन कोरपना तहसील कार्यालयात तहसीलदार साहेबाना दिले.
केंद्रातील मोदी सरकार युवकांसाठी वर्षाला २कोटी रोजगार निर्मिती करण्याचे आश्वासन देऊन सत्तेवर आले.पण परिस्थिती मात्र वेगळीच आहे.
नोटबंदीमुळे भारतात सर्वात जास्त रोजगार निर्मिती करणाऱ्या कृषी व सूक्ष्म लघु ,मध्यम उद्योग क्षेत्राला मोठा फटा बसला.त्याची परिणीती म्हणजे करोडो रोजगार नष्ट झाले.वस्तू सेवा कराच्या कुटीर,व लघु मध्यम क्षेत्राचे आणि उद्योग धंद्याचे पार कंबरडे मोडले.याचा परिणाम म्हणजे बेरोजगारी मोठ्ठ्या प्रमाणात वाढली.पंतप्रधान मोदी यांच्या २० लाख करोडाच्या पैकेज मधून बेरोजगार युवक,शेतकरी व लघु ,मध्यम उद्योग क्षेत्र यापैकी कोणत्याही घटकास मदत झाली नाही.
पंतप्रधान मोदींनी दरवर्षी २ कोटी रोजगार निर्मितीचे आश्वासनाला जाणून रोजगार निर्मितीवर लक्ष दिले पाहिजे.युवक हे निराश झाले आहेत,आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे.केंद्र सरकारने रोजगार निर्मितीची स्वतःची जबाबदारी ढकलून चालणार नाही.तरुण हाताना काम हवे आहे!
मोदी सरकारकडे आमची मागणी एकच आहे, रोजगार दो!
या बाबतचे निवेदन तहसीलदार साहेब कोरपना यांना युवक काँग्रेस कमिटी जिवती यांनी दिले.
निवेदन देत असताना, शैलेश लोखंडे तालुकाध्यक्ष युवक काँग्रेस कोरपना ,विलास मडावी महासचिव राजुरा विधानसभा युवक काँग्रेस तालुकाउपाअध्यक्ष अतुल गोरे गडचांदूर युवक कांग्रेसचे शहर अध्यक्ष रुपेश चुधरी गणेशभाऊ तुरणकर, प्रकाश मोहूले तालुका उपाध्यक्ष ,निसार शेख अल्पसंख्याक शहर अध्यक्ष विनोद मरसकोले महासचिव कोरपना , आदींनी निवेदन दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here