सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या मागणीला यश

0
687

सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या मागणीला यश


दिनांक 18 एप्रिल 2023 रोजी सम्यक विद्यार्थी आंदोलन जिल्हा चंद्रपूर च्या वतीने समाज कल्याण विभाग चंद्रपूर चे अधिकारी अमोल यावलीकर यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले.

सम्यक विद्यार्थी आंदोलन चंद्रपूर चे माजी जिल्हाध्यक्ष धिरज तेलंग यांनी समाज कल्याण अधिकारी यांना DBT अंतर्गत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती त्यांच्या खात्यात जमा होत असते परंतु 2020 पासून तर आता पर्यंत विद्यार्थ्याच्या खात्यात शिष्यवृत्ती जमाच केलीच नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असतांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. या संदर्भात त्यांच्या सोबत चर्चा केली व समाज कल्याण चंद्रपूर या विभागातर्फे एक पत्रक काढून सर्व महाविद्यालयाला सांगा की विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांच्या खात्यात जो पर्यंत शिष्यवृत्ती जमा होत नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित ठेऊ नये आणि विद्यार्थ्यांकडून महाविद्यालयाची फि भरण्या साठी जबरदस्ती करू नये. अश्या पद्धतीने तोडगा काढण्यासाठी साठी धिरज तेलंग यांनी सांगितले व निवेदन सादर केले. त्याच प्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना यासंदर्भात सुद्धा चर्चा केली व निवेदन सुद्धा दिले. त्यांनी या संदर्भात सांगितले की, या वर्षीची स्वाधार योजनेची निधी फक्त 10 टक्के च आलेली आहे. त्यामुळे थोडा वेळ लागेल लवकरच पूर्ण येणार आहे. आल्याबरोबर तो निधी विद्यार्थ्याच्या खात्यात जमा होईल. आणि स्वाधार योजने चा लाभ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना मिळायला पाहिजे त्यासाठी ईतर मागण्याचे सुद्धा निवेदन देण्यात आले.

यावेळी सम्यक ची कार्यकर्ते व विद्यार्थी नम्रता सावंत, अश्विनी नेवारे, तेजस मेश्राम, नागराज कांबळे, निकिता कांबळे, नीलेश कांबळे, पवन गायकवाड, प्रविण गायकवाड, बजरंग कांबळे, संदीप घोसे, पृथ्वीराज गायकवाड ईत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here