काकाच्या जागेवर पुतण्यांचा कब्जा!

0
720

काकाच्या जागेवर पुतण्यांचा कब्जा!
अल्का आत्रामने आक्षेप नाेंदवित केली चाैकशीची मागणी
गाेंडपिपरी(चंद्रपूर), किरण घाटे : गोंडपिपरी तालुक्यातील गोजोली या गावातील दोन पुतण्यांनी चक्क सख्या काकाच्या जागेवर कब्जा करून घरकुलाचे बांधकाम करण्यास सुरूवात केली आहे.

या बाबत हाती आलेल्या माहिती नुसार असे कळते की,गोजोली येथील रहिवाशी सुधाकर भिमा आत्राम यांच्या आपसी वाटनीला आलेल्या सांदवाडीच्या जागेवर त्याचे दोन पुतणे उमदेव बुधा आत्राम आणि भेषाबराव बुधा आत्राम यांनी काकाच्या आणि त्यांच्या वारसदारांच्या गैरहजेरीत सांदवाडीची जागा बळकावून त्यावर घरकुल योजनेतून घर बांधकाम करण्यास सुरूवात केली आहे.सुधाकर आत्राम हे गेल्या बऱ्याच वर्षापासून बेपत्ता आहेत त्यांचा इतरत्र शोध घेतला असता कुठेच थांगपत्ता लागला नाही.कुटुंबातील प्रमुख आणि कर्ता पुरुष सोबत नाही आणि त्यातच ईतर कुणाचा सहारा नसल्याने त्यांची पत्नी शोभा सुधाकर आत्राम ही आपल्या दोन मुलीला सोबत घेऊन माहेरी निघून आली आणि तिथेच राहून मुलींचे पालन पोषण केले.मोठी मुलगी अल्का हीचे आठ वर्षपूर्ती लग्न झाले तिच्या पश्चात लहान मुलगी देवी शिक्षण घेत आहे.

पती घर सोडून गेल्यावर शोभा आत्राम यांचेवर संपूर्ण कुटुंबाची जिम्मेदारी आली.गोजोलीत त्यांच्या हक्काचे घर नाही अश्यातच त्यांनी मुलींच्या भविष्याचा विचार करून त्या माहेरी आल्या आणि तिथेच राहून मिळेल ते काम करून दोन मुलींना शिकविल, घडवील, वडिलांची उणीव भासू दिली नाही.सुधाकर आत्राम यांना हयात पत्नी आणि दोन मुलीं असे वारस असून त्यांना विचारात न घेता उमदेव आत्राम आणि भेषाबराव आत्राम या दोघांनी मिळून त्यांची जागा बळकावन्याचा कुटील डाव रचत आहेत.

दोघांना घरकुल मंजूर झाले, मंजुरी साठी ग्राम पंचायत मध्ये रीतसर त्यांनी स्वमालकीच्या जागेचा गृह नमुना आठ अ सादर केला. त्याच जागेवर बांधकाम करणे अनिवार्य असताना दुसऱ्याची जागा बळकावून त्यावर शासकीय योजने अंतर्गत बांधकाम करणे गैर कृत्य आहे.एकंदरीत या दोघांकडून शासनाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न चालु आहे.स्वमालकीच्या जागेवर घरकुलाचे बांधकाम करत असतील तरच त्यांना शासकीय लाभ देण्यात यावा अन्यथा घरकुल नामंजूर करण्यात यावे असा आक्षेप घेत मुलगी अल्का आत्राम हिने गट विकास अधिकारी यांना निवेदन सादर केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here