दिव्यांग बांधवांना घरासाठी जमीन पट्टे द्या : पद्मा त्रिवेणी

0
227

दिव्यांग बांधवांना घरासाठी जमीन पट्टे द्या : पद्मा त्रिवेणी


दिव्यांग विकास समिती, चंद्रपूर संचलित वृक्षवल्ली दिव्यांग कल्याण बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा सौ. पदमा त्रिवेणी घुग्घुस येथील दिव्यांग बांधवांना घरे बांधण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याची विनंती पदमा त्रिवेणी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे.

सोमवारी वृक्षवल्ली दिव्यांग कल्याणकारी बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा सौ. पदमा त्रिवेणी यांनी घेतली चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांची भेट
घुग्घुस येथे उपस्थित 120 दिव्यांग बांधवांना घरे बांधण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. यासोबतच दिव्यांग बांधवांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, दिव्यांग बांधवांना देण्यात येणाऱ्या पेन्शनमध्ये वाढ करण्याची मागणीही करण्यात आली आहे. यावेळी अध्यक्षा सौ. पदमा त्रिवेणी, गौरव नंदकुमार ठेंगणे, गणेश श्रीकृष्ण कामतवार, बिलकिश बानो शेख, नीता विनोद झाडे, किशोर मारोती सपाट,प्रवीण विजय सोनडुले, गोपाळ श्रीकृष्ण ठाकरे, निलेश क्रिस्तस्वामी पिट्टलवार उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here