पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेत भारतीय जनता पक्षाचे निवडून आलेले सदस्य कुचकामी

0
756

पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेत भारतीय जनता पक्षाचे निवडून आलेले सदस्य कुचकामी

दुबारपेठ गावांत पाण्याची गंभीर समस्या

रास्त मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर गावकरी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आंदोलन छेडणार – भूषण मधुकरराव फुसे (चंद्रपूर पश्चिम जिल्हाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी)

 

 

 

गोजोली/गोंडपिपरी
दिनांक ४ जून
गोंडपिपरी तालुक्यातील धाबा जिल्हा परीषद सर्कल मध्ये गोजोली गावाजवळ दुबारपेठ ग्राम पंचायत हे तीन गावे मिळून एक ग्राम पंचायत असून दुबरपेठ हे गाव १०० टक्के आदिवासी बहुल गाव आहे. सरपंच, उपसरपंच व पंचायत समिती सदस्य आदिवासीं समाजाचे असतानाही या गावात पाणी समस्या हे अति भयंकर आहे. पाणीपुरवठा विभागांतर्गत गावांत टाकी बांधले पण महिन्यातून एकदा नळाला पाणी येते, कधीकधी तीन-तीन महिने नळाला पाणी येत नाही. गावात आठ बोअरवेल आहेत पण एकाच बोअर ला पाणी आहे, हे एक कांडच… पाणी पुरवठा नियमित नसताना ग्रामपंचायत ने वार्षिक पाणी कर १५०० रुपये लादलेले आहेत. अनेक वर्षांपासून या गावात पाणी पुरवठा सकमुर या गावातून ८ ते १० किलोमिटर अंतरावरून पाइपलाइन ने पाणी येताना कित्येक ठिकाणी पाइप लाईन फुटून असल्याने पाणी समस्या बिकट होत आहे . याकडे शासन व प्रशासन चक्क दुर्लक्ष करीत आहेत. या परिसरातील लोक प्रतिनिधी मूग गिळुन बसलेले आहे, वंचित बहुजन आघाडी चे जिल्हा अध्यक्ष भुषण फुसे, चंद्रपूर जिल्हा महासचिव आनंदराव अंगलवाऱ व रमेश लिंगमपालीवार, जिल्हा उपाध्यक्ष गावांत विविध समस्या जाणुन घेण्यासाठी गेले असता गावातील बहुसंख्य महिला व पुरुष एकत्र येऊन समस्यांबाबतचे पाढे वाचले. या परिसरातील पंचायत समिति सदस्य अरुण कोडापे, जिल्हा परीषद सदस्या सौ. वैष्णवीताई अमर बोडलावार भाजपाचे सदस्य होते व चक्क पाच वर्षाचे कार्यकाळ संपून गेले तरी पण गावातील समस्या सोडविली नाही म्हणून गावातील जनतेचा रोष आहे. याप्रसंगी अविनाश राऊत, मुरलीधर येलमुळे, आनंद आत्राम सह गावातील बहुसंख्य महिला व पुरुष उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here