विरोधी पक्ष नेते अजित दादा पवार मोठ्या अपघातातून बचावले

0
409

 

बारामती: तिसऱ्या मजल्यावरून चौथ्या मजल्यावर जायला निघालो, पण मध्येच वीज गेली आणि चौथ्या मजल्यावर पोहोचायच्या काही सेकंद आधीच आमची लिफ्ट धाडकन खाली आदळली. परमेश्वराचे आणि तुम्हा सगळ्या लोकांचे आशीर्वाद म्हणून मी अपघातातून वाचलो, नाही तर आज श्रद्धांजली सभाच घ्यावी लागली असती, असा जीवघेणा अनुभव विरोधी पक्ष नेते अजित दादा पवार यांनी सांगितला. ते बारामतीत बोलत होते. विरोधी पक्ष नेते अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत. तालुक्यातील पवई माळ येथील विविध विकास कामांची भूमिपूजन अजित दादांच्या हस्ते पार पडले. याच कार्यक्रमात बोलताना शनिवारी पुण्यात लिफ्ट मध्ये अडकल्याचा जीवघेणा अनुभव त्यांनी मिश्किल शैलीत कथन केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here