चेक फुटाणा शेत शिवारात वाघांची दहशत ! बंदोबस्त करण्याची सरपंच व गावकऱ्यांची मागणी

342

 

पोंभुर्णा तालुका प्रतिनिधी

वनपरिक्षेत्र पोंभूर्णा अंतर्गत चेक फुटाणा येथील शेत शिवारात मागील पाच दिवसांपासून तीन वाघांचे वास्तव्य असल्याचे नागरिक सांगत आहेत. या वाघांच्या वास्तव्य मुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड भीती संचारली आहे. त्यामुळे या वाघांचा वनविभागाने त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी सरपंच जयश्री अर्जुनकर, उपसरपंच साईनाथ पिंपळकर, गणेश अर्जुनकर व गावकऱ्यांनी केली आहे.

==================================

चेक फुटाणा शेत शिवारात वाघाचा वावर असल्याचे गावकऱ्यांनी कडून सांगण्यात येत आहे. त्यानुसार दिघोरी व भोसरी बीटातील कर्मचाऱ्यांसह या भागात गस्त वाढवण्यात आली आहे. आवश्यकतेनुसार वाघांचा बंदोबस्त करण्याबाबत कारवाई केली जाईल.

-फणींद्र गादेवार, वनपरिक्षेत्राधिकारी पोंभूर्णा

advt