जी आर इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड च्या वतीने रक्त दान व डोळे तपासणी शिबीर संपन्न

114

जी आर इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड च्या वतीने रक्त दान व डोळे तपासणी शिबीर संपन्न

गडचांदूर : संपूर्ण देशात सुरक्षा सप्ताह सुरू असून जी आर इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीच्या वतीने सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात येत आहे . सामाजिक बांधीलकी जपत दिनांक १४ जानेवारीला डोळे तपासणी शिबीर व १५ जानेवारीला रक्त दान शिबीर आयोजित करण्यात आली होति या शिबिरात ३५ रक्तदात्यांनी रक्त दान केले. श्री साईनाथ ब्लड बँक नागपूर यांच्या सहयोगाने रक्त दान शिबीर संपन्न झाले.

.यावेळी प्रवीण कुमार पाटील जिल्हा वाहतूक शाखा पोलीस निरीक्षक, विष्णू कुंभलकर सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक, दिपक खेकारे उपसरपंच ग्राम पंचायत खिर्डी,शर्मा डेप्युटी प्रोजेक्ट मॅनेजर,पूनम कुमार अर्जापुरे,ब्लड बँकेचे अनिल ढोणे, आशिष ताजने आणि रक्त दाते उपलब्ध होते.

advt