साप्ताहिक प्रतिकार संपादक स्मृति. चरणदास नगराळे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण

0
606

साप्ताहिक प्रतिकार संपादक स्मृति. चरणदास नगराळे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण

बुद्ध भूमी राजुरा येथे कार्यक्रमाचे आयोजन

राजुरा, 16 जाने. : साप्ताहिक प्रतिकार संपादक व यंग मेन्स बुद्धिस्ट वेलफेअर असोसिएशन चे अध्यक्ष चरणदास नगराळे यांचे 11 जानेवारीला दिर्घ आजाराने निधन झाले. त्यांना 14 जानेवारीला बुद्ध भूमी राजुरा येथे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

समता सैनिक दल राजुरा, एकता मंच राजुरा, भारतीय बौद्ध महासभा शहर शाखा राजुरा, संविधान हक्क संरक्षण समिती राजुरा, नागवंश युथ फोर्स राजुरा आणि समस्त स्मृति. आयु. चरणदास नगराळे यांच्याशी निगडित असलेले तसेच उपस्थित असलेल्या सर्व उपासक उपासिका यांच्या उपस्थितीत भावपूर्ण श्रद्धांजली कार्यक्रम पार पडला.

सन्माननीय मार्शल विवेक बक्षी सर, मार्शल निवारण कांबळे सर, पत्रकार अमोल राऊत, आयु. गणपत पुणेकर, आयु. मेघाताई बोरकर या समाज बांधवांनी नगराळे साहेबांवरती आपले विचार व्यक्त करत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयु. विनोद निमसरकार यांनी तर आभार आयु. भीमराव खोब्रागडे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here