दोन वर्षा दिव्यांग निधी चा वाटपच नाही ; नोकरी ग्रामपंचायतीचा प्रकार

0
383

दोन वर्षा दिव्यांग निधी चा वाटपच नाही ; नोकरी ग्रामपंचायतीचा प्रकार

दिव्यांगाना झिजवावे लागत आहे उंबरठे, ग्रामसेवकांची कार्यालयाला दांडी

 

आवाळपूर/सतीश जमदाडे : स्थानिक स्वराज्य संस्थेतील ग्राम पंचायत ही सर्वांत खालचा भाग समजला जातो यात महारष्ट्र अधिनियम 1961 नुसार अनुसूची 1, 2 नुसार ग्राम पंचायत स्तरावरील 5% निधी हा अपंग व्यक्ती करिता राखीव ठेवून तो त्या स्तरावर खर्च करावयाचा असतो. त्याचे अधिकार सुध्दा त्या ग्राम पंचायत स्तरावरावरील सचीवा कडे देण्यात आले आहे. परंतू ग्राम पंचायत नोकरी येथील 5% अपंग निधी वाटप न केल्याने संक्षयाचा भोवरा फिरला असून शंका कुषकाना पेव फुटला आहे.

तालुक्यातील छोटी ग्राम पंचायत म्हणून ओळख असलेली नोकरी ( पाल ) ग्राम पंचायत निधी ने मात्र श्रीमंत म्हणून ओळखल्या जाते. अल्ट्राटेक सिमेंट कंपनीचा कर अंदाजे 60 ते 70 लाख येतो आणि बाकीचा घर टॅक्स ग्राम पंचायतीला प्राप्त होत असतो. त्या पैकी 5% निधी हा अपंगावर खर्च करायचा असतो मात्र 2020 -21, 2021-22 असे दोन सत्र उलटूनही खर्च न केल्याने दिव्यांगा मध्ये रोष व्यक्त केल्या जात आहे.

आमचा हक्काचा निधी आम्हला द्यावा या करिता वारवार ग्राम पंचायत कार्यलयात गेले असता विविध कारणे देवून वाट काढण्याची काम केले तर कधी वस्तू चे अंदाजपत्रक आना आम्ही निधी देतो असे म्हणत चालते केले. अजूनही दिव्यांग कार्यलयाची उंबरठे झिजवताना दिसून येत आहे.

ग्रामसेवक हा कार्यालयाला नेहमी येत नसल्याची नागरिकांची ओरड आहे एवढेच नाही तर अपंग निधी बाबत विचारणा केली असता उडवा उडविचे उत्तर देवून चालत केल्या जाते. विशेष म्हणजे सभेत न आलेल्या सभासदांची स्वाक्षरी घेण्यासाठी चपराश्यांना त्याचा घरी सभा बुक घेऊन पाठवत असल्याची चर्चा गावात आहे. वरीष्ठ अधिकारी यांनी या प्रकरणी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

मी स्वतः अपंग असून ग्रामपंचायत मध्ये आमचा निधी बाबत विचारणा केली असता निधी मिळून जाईल असे सांगितले जाते परंतू दोन वर्षा पासून निधीच मिळाला नाही.संगीता गणपत देशमुख, नोकरी

अपंग निधी बाबत उद्याला निधी वाटप करण्याचे ठरविण्यात आले आहे.सुभाष सारये, सचिव, ग्राम पंचायत नोकरी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here