युवकांनी ग्रामीण या शब्दाचा न्यूनगंड बाळगू नका – सुशिल कुमार नायक, उपविभागीय पोलिस अधिकारी आवाळपूर

0
463

युवकांनी ग्रामीण या शब्दाचा न्यूनगंड बाळगू नका – सुशिल कुमार नायक, उपविभागीय पोलिस अधिकारी आवाळपूर

आवाळपूर : शारीरिक सुदृढतेसाठी खेळाला महत्त्व दिले पाहिजे. शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागातील युवक हा अधिक सुदृढ आणि सक्षम असतो. त्यामुळे ग्रामीण भागातील तरुणांनी खचून न जाता अधिक बळकटीने समोर जावे. ग्रामीण भागातीलच युवक हा विविध क्षेत्रात मोठ-मोठ्या पदावर कार्यरत असून आपली जबाबदारी पार पाडत आहे.त्यामुळे युवकांनी ग्रामीण भागातील आहोत याचा न्यूनगंड न बाळगता अधिक मेहनत करून आपले ध्येय गाठावे. असे प्रतिपादन उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक यांनी नांदा येथील स्व वसंत तुमरम यांचा स्मुर्ती प्रीत्यर्थ आयोजित व्हॉलिबॉल स्पर्धेचा उद्घघाटनिय प्रसंगी व्यक्त केले.

पुढे ते बोलतांना म्हणाले की,अजाच काळ हा स्पर्धेचा असल्याने प्रत्येकाने आपापल्या क्षेत्रात सफल होण्याकडे कूच केली पाहिजे मग ते स्पर्धा परीक्षा असो की कोणतेही क्षेत्र त्यात जिद्दीने प्रयत्न केले पाहिजे. पोलिस भरती समोर येवून ठासली आहे त्यामुळे परिसरातील युवकांनी तयारी करावी. तसेच कोणतीही मदत लागल्यास मी सर्वोतोपरी मदत करण्यास तयार आहे. तसेच त्यांनी नांदा येथील सुरू आसलेल्या दोन्ही वाचनालयाला स्पर्धा परीक्षा पुस्तके भेट देण्याचे आश्वासन सुध्दा दिले. यावेळी पेटकर विकास अधिकारी अल्ट्राटेक, उपसरपंच पुरुषोत्तम आस्वले, पुरुषोत्तम निब्रड, रत्नाकर चटप,रवी बंडीवार, हर्षल धाबेकर उपस्थित होते.

सदर रुद्रा स्पोर्टीग क्लब आयोजीत दोन दिवसीय व्हॉलिबॉल सामने पार पडले यात प्रथम पारितोषिक धोपटाळा, दुसरे पारितोषिक गडचांदूर, तृतीय पारितोषिक बामनवाळा, यांनी पटकाविले. व्हॉलिबॉल स्पर्धेचा यशस्वीतेसाठी रुद्रा स्पोर्टीग क्लब चा सदस्यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here