नैराश्यातून युवकाची घरीच गळफास घेत आत्महत्या, आवाळपूर येथील घटना

15

नैराश्यातून युवकाची घरीच गळफास घेत आत्महत्या, आवाळपूर येथील घटना

आवाळपूर:- दिवसेंदिवस युवकांमध्ये नैराशाचे प्रमाण वाढतच चालले आहे. त्यामुळे युवकांकडून टोकाचे पाऊल उचलन्याचे प्रमाणही वाढले आहे. याच तनावाच्या परिस्थितीतुन आवाळपूर येथील रहिवाशी असलेल्या अमरीश हनुमान नागरकर वय ३४ वर्षे या युवकांने घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दिनांक १४ नोव्हेंबर दुपारी 3 वाजेच्या सुमारास घडली घडली.

सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की आवाळपूर येथील अमरीश हनुमान नागरकर हा नियमितपणे आज सकाळी अल्ट्राटेक येथे कामावर गेला. दुपारी सुट्टी झाल्यानंतर घरी आल्यावर जेवण केले. आई शेतात मजुरीकरिता गेली होती. पत्नी माहेरी गेली होती. वडीलही बाहेर होते. घरी कोणीच नसल्याने पत्नीला मोबाईल वर संपर्क करत मी जीवन संपवीत असल्याचे सांगितले. शेजारील युवकांनी लगेच धाव घेतली मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.दुपारी 3 च्या सुमारास स्वतःच्या राहत्या घरीच ओढणीने गळफास लावत आत्महत्या केली. मिळालेल्या माहितीनुसार अमरीश अनेक दिवसापासून तणावात व नैराश्यात असल्याचे कळले.
अमरीश च्या मागे एक मुलगी, लहान मुलगा, पत्नी, आई वडील असा बराच मोठा परिवार असून एवढ्या कमी वयात अमरीश च्या जाण्याने कुटुंबावर मोठा आघात झाला असून कुटुंबाला मोठया आर्थिक अडचणीचा सामना करावा लागणार आहे.

advt