गडचांदूर भाजप महिलातर्फे सोशल मीडिया प्रतिनिधींचा सत्कार.

0
334

गडचांदूर भाजप महिलातर्फे सोशल मीडिया प्रतिनिधींचा सत्कार.

कोविड योद्धा म्हणून गौरवपत्राने सन्मानित.

 

कोरपना:- प्रवीण मेश्राम

“कोरोना” विषाणूने अख्ख्या जगाला वेठीस धरले असून या संकटसमयी आशा वर्कर,सफाई कामगार,डॉक्टर, पत्रकार,सोशल मिडियांचे प्रतिनिधी हे जीवाची पर्वा न करता रात्रंदिवस कोविड योद्धा म्हणून जनतेच्या रक्षणासाठी तैनात आहे.यांच्या कार्याची दखल घेत महाराष्ट्राचे माजी अर्थ,नियोजन व वनमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून भाजपा महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने रक्षाबंधनाच्या पवित्र पर्वावर गडचांदूर शहरातील इतर प्रतिनिधींसह कोरपना तालुका ग्रामीण पत्रकार संघाच्या सोशल मिडिया प्रतिनिधी सैय्यद मूम्ताज़ अली,दीपक खेकारे,गौतम धोटे,मयूर एकरे,विनोद हरने,अतूल गोरे यांचा भाजप महिला आघाडीच्या सौ.निता क्षीरसागर,सौ.शकुंतला कोसरे तसेच माजी आमदार अँड.संजय धोटे यांच्या हस्ते गौरव प्रमाणपत्र प्रदान करून सत्कार करण्यात आला.यावेळी सतीश धोटे,राजूरा नगरसेवक अडानीया,गडचांदूर भाजप शहराध्यक्ष सतीश उपलेंचवार,माजी नगरसेवक निलेश ताजने,जेष्ठ नेता महेश शर्मा,शिवाजी सेलूकर,नगरसेवक अरविंद डोहे,नगरसेवक रामसेवक मोरे, अरविंद कोरे,बबलू रासेकर,विलास क्षीरसागर,अजीम बेग,वैभव राव आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here