भिसी येथे सब पोस्ट ऑफिस सुरू करण्यासाठी आमदार बंटी भांगडीया यांचा पुढाकार

0
566

भिसी येथे सब पोस्ट ऑफिस सुरू करण्यासाठी आमदार बंटी भांगडीया यांचा पुढाकार

माजी मुख्यमंत्री देवेद फडणवीस यांच्या माध्यमातून केंद्रीयमंत्री अश्विन वैष्णवी यांना दिले पत्र

 

चिमूर : चिमूर तालुका राज्यातील सर्वात मोठा तालुका असून लोकसंख्या व क्षेत्रफळ चे आधारावरून अप्पर भिसी तालुका स्थापन करण्यात आला असून भिसी येथे सबपोस्ट ऑफिस सुरू करण्यासाठी आमदार बंटीभाऊ भांगडीया यांनी माजी मुख्यमंत्री विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून केंद्रीयमंत्री अश्विन वैष्णवी यांना पत्रव्यवहार करीत मागणी केली आहे.

चिमूर तालुक्याचे विभाजन करून भिसी अप्पर तालुका निर्मिती झाली असून भिसी परिसरात कापूस व हळद मोठ्या प्रमाणात उत्पादन होत असून सब पोस्ट ऑफिस निर्माण झाल्यास पत्रव्यवहार सोबत रोख व्यवहार व पोस्ट ऑफिस संबंधित कामे सुरळीत होऊन जनतेला त्रास होणार नाही. उत्तम सेवा दिली जाईल.

भिसी येथे सब पोस्ट ऑफिस सुरू करण्यासाठी आमदार बंटी भांगडीया यांनी विरोधी पक्षनेते देवेद्र फडणवीस यांच्या मार्फत केंद्रीय मंत्री अश्विन वैष्णवी यांना पत्रव्यवहार करून मागणी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here