माजी आमदार निमकर यांच्या हस्ते अनिरुद्ध डाखरे यांचा दैदिप्यमान यशाबध्दल सत्कार

0
586

माजी आमदार निमकर यांच्या हस्ते अनिरुद्ध डाखरे यांचा दैदिप्यमान यशाबध्दल सत्कार

 

राजुरा येथील नानाजी डाखरे गुरुजी व उषाताई यांचे चिरंजीव अनिरुद्ध डाखरे हे नीट परीक्षेत 720 पैकी 710 गुण घेऊन देशात 38 व ओबीसी प्रवर्गात महाराष्ट्रातून 8 वा क्रमांक घेऊन उत्तीर्ण झाल्याबद्दल राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार, विद्या शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुदर्शन निमकर यांच्या हस्ते व राजुरा तालुका धानोजे कुणबी समाज मंडळाचे अध्यक्ष सेवानिवृत्त प्राचार्य दौलतराव भोंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत तथा वि.मा.शी. संघाचे जिल्हाध्यक्ष केशव ठाकरे गुरुजी, विधा शी. प्र.मंडळाचे उपाध्यक्ष बाबाराव वाभीटकर गुरुजी, शिवाजी आश्रम शाळा सुबई चे मुख्याध्यापक दादाजी झाडे यांच्या उपस्थितीत अनिरुद्ध व त्यांच्या आई वडिलांसह त्याच्या दोन बहिणी ज्या एम.डी.व एमबीबीएस करीत असलेल्या कु. अक्षता व कु. वैष्णवी सह कुटुंबाचा सत्कार करण्यात आला.

अनिरुद्ध नी राजुरा तालुक्यासह चंद्रपूर जिल्ह्याचे नाव रोशन केल्याबध्दल अभिनंदन केले व पुढील उज्वल भविष्याच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी माजी आमदार निमकर यांनी सुचविल्यानुसार, समाजाचे अध्यक्ष प्रा.भोंगळे सरांनी समाजाच्या वतीने लवकरच अनिरुद्ध चा कुटुंबियांसह सत्कार करण्याचे ठरविण्यात येईल असे सांगितले.

advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here