घाण पाण्याचा प्रश्न सोडविण्याची सानू सिद्दीकी यांची मागणी…

0
665

घाण पाण्याचा प्रश्न सोडविण्याची सानू सिद्दीकी यांची मागणी…

घुग्घुस येथील स्नेहप्रभा मंगल कार्यालयाचे मालक चंद्रपूर विधानसभा सदस्य किशोर भाऊ जोरगेवार यांच्या कार्यालयाच्या मागे प्रभाग क्रमांक १० येथे सेन्हामंगल कार्यालयातील नाल्यातील सर्व घाण पाणी तिथे राहणाऱ्या नागरिकाच्या घरात जात आहे. सदरचे घाण पाणी लगतच्या भागातही साचत आहे. त्यामुळे तेथील रहिवाशांना नाहक त्रास होत आहे. ही समस्या कायमची बनली आहे.

यामुळे लोकांना मलेरिया, टायफॉइड, त्वचेची समस्या अशा अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे. येथे सानू सिद्दीकी घुग्घुस शहर अध्यक्ष (एआयएमआयएम) आणि त्यांची कार्यकर्ते यांनी समस्या जाणून घेतली. तिथे पोहोचून चौकशी केली.

थांबा भेट पाहून हा प्रश्न सोडवावा, अशी मागणी या सर्वांनी प्रसार माध्यमांमार्फत केली असून हा प्रश्न न सुटल्यास आपल्या पक्षातर्फे आंदोलन करण्याचा इशारा सिद्दीकी यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here