वढोली सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी रमेश चुदरी तर उपाध्यक्षपदी विश्वनाथ चुदरी यांची निवड

0
530

वढोली सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी रमेश चुदरी तर उपाध्यक्षपदी विश्वनाथ चुदरी यांची निवड

 

 

गोंडपिपरी :- राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या वढोली येथिल सेवा सहकारी संस्थेच्या संचालक मंडळाची निवडणूक सोबतच निकाल मागच्या महिन्यात पार पडला.प्रतिष्ठेच्या लढतीत सुरज माडुरवार गटाच्या “किसान एकता” पॕनलचा पगडा भारी ठरला होता.

 

१३ संचालक असलेल्या वढोलीच्या सेवा सहकारी संस्था निवडणुकीत माजी सरपंच,माजी उपसरपंच यांच्या सह अन्य लोकांनी एकत्र येत पूर्ण पॅनल लढवली या मात्तबरांना किसान एकता पॅनेलने धक्का दिला १३ उमेदवार बहुमताने निवडणून आले.

 

रमेश चुदरी, विषवनाथ चुदरी,अनुप कुंभारे,बंडू खरबनकर, पांडुरंग हरी कोहपरे,मारोती लाटकर,साजन माडुरवार,अनिल पोलजवार,शामराव सोनटक्के,जयराम मानकर,किशोर चुदरी, ज्योति भोयर,मंगला खरबनकर यांनी विजय मिळवला होता.

 

दि.२९ शुक्रवारी अध्यक्ष उपाध्यक्ष निवडणूक पार पडली यात सर्वानुमते अविरोध रमेश चुदरी यांची अध्यक्ष पदी निवड करण्यात आली.तर उपाध्यक्षपदासाठी दोन संचालक इच्छुक असल्याने ईश्वर चिट्टी टाकून उपाध्यक्ष निवडण्यात आला त्यात विषवनाथ चुदरी यांची वर्णी उपाध्यक्ष पदी लागली .
सर्व संचालक तथा अध्यक्ष उपाध्यक्ष पदग्रहन सोहळा नुकतच पार पडला यावेळी सर्व अध्यक्ष उपाध्यक्षसह नवनियूक्त संचालकांचा सत्कार करण्यात आला.यावेळी किसान एकता पॅनल चे संजय माडुरवार ,ग्रा पं सदस्य संदिप पौरकार,माजी सरपंच उमाकांत चुदरी,शाळा व्यवस्थापन समिती चे माजी अध्यक्ष संदिप लाटकर,ताराचंद कोपुलवार,माजी उपसरपंच मोहन चुदरी,संस्थेचे सचिव मुरलीधर लाटकर यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here