चंद्रपूरात मिळताेय प्रेमाच्या चहाला उत्तम प्रतिसाद ! नाेकरीची आस न धरता विनाेद थेरे यांनी थाटला स्वताचा व्यवसाय!

0
1287

चंद्रपूरात मिळताेय प्रेमाच्या चहाला उत्तम प्रतिसाद !
नाेकरीची आस न धरता विनाेद थेरे यांनी थाटला स्वताचा व्यवसाय!
किरण घाटे

चंद्रपूर:-   शासकीय नाेकरीची आस न धरता विनाेद थेरे यांनी स्वताचा व्यवसाय चंद्रपूरात आरंभ केला आहे.सध्या त्याचा प्रेमाचा चहा अख्ख्या चंद्रपूर नगरीत लोकप्रिय झाला आहे .शहरातील मध्यवर्ती भागातील जटपूरा गेट परिसरात गत एक वर्षापूर्वि विनाेद थेरे यांनी खास ग्राहकांसाठी प्रेमाचा चहा सुरु केला आज शेकडाे ग्राहक सकाळ पासून तर रात्री उशिरा पर्यंत प्रेमाच्या कपात प्रेमाचा चहा घेत असल्याचे चित्र प्रत्यक्षात दिसून येते .
दिवसांगणिक ग्राहकांची गर्दी वाढत असुन ग्राहकांशी प्रेमाने वागणे हा विनाेदचा स्वभावगुण असल्यामुळे चहा सेंटरला ग्राहकांची रीघ लागलेली असते.   अल्पकालावधीच ग्राहकांची मने विनाेद थेरे यांनी आपल्या मधुर बाेलण्याने जिंकली असुन , दुकाणाच्या भितीवरील विविध संदेश देणारी पत्रके सर्वांचे लक्षवेधुन घेणारी अशीच आहे .

विनाेद थेरे यांनी स्वताचा व्यवसाय सुरु करुन आपल्या कुंटुबाच्या उदारनिर्वाह प्रश्न मिटविला निश्चिंतच ही अभिनंदनिय बाब आहे , अशी प्रतिक्रिया यंग चांदा ब्रिगेड चे विद्यार्थी आघाडी शहर प्रमुख अजय दुर्गे यांनी व्यक्त केली आणि यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा देखिल दिल्यात .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here