दंपूरमोहदा गावात धान्य वितरक दुकानदार विरोधात जनतेचा आक्रोश
जिवती । गोविंद वाघमारे : माहे ऑक्टोंबर महिन्याचे मोफत राशन कसल्याच प्रकारे वाटप न करता फक्त मोफत मधील चणाडाळ देऊन लोकांचे अंगठे घेण्यात आले इतर गावातील दुकानदारांकडून चौकशी केली असता इतर धान्य सुध्दा मोफत वाटप करण्यात आले आहे समजल्यानंतर गावातील नागरिकांनी तहिसलदार व SDO आणि जिल्हाधिकारी यांच्या तक्रार केल्या नंतर या दुकानदारांची मान्यता रद्द करण्यात आली होतो मात्र दोन दिवस झाले यांना आ. जिल्हा पुरवठा अधिकारी आर.आर. मिस्किन यांनी धान्य दुकानदारास रेशन वाटप करण्यासाठी कसल्याच प्रकारची परवानगी देण्यात आली नाही तरी दुकानात बेकायदेशीर विकलेल्या माल आणुन कार्ड धारकांना वाटप करत आहे. अशी माहिती कळताच गावातील लोकांनी गावात सभा घेऊन सर्वांच्या अनुमतीने असे निर्णय काढण्यात आले की, श्री.अनिल मोतेवाड यांचा परवाना रद्द करून नवीन राशन दुकानदारांची नियुक्ती करावी.जर असे झाले नाही तर रस्त्यावर उतरून आंदोलन करताना येईल अशा इशारा गावातील नागरिकांनी दिला आहे.
