२६ जानेवारी निमित्त जि. प. उ. प्राथ. शाळा कन्या घुगुस येथील फुटबॉल खेळणाऱ्या विद्यार्थ्यांना किटचे वाटप

0
488

२६ जानेवारी निमित्त जि. प. उ. प्राथ. शाळा कन्या घुगुस येथील फुटबॉल खेळणाऱ्या विद्यार्थ्यांना किटचे वाटप

आज दि. २६ जानेवारी दिनानिमित्त मॅजिक बस इंडिया फॉऊंडेशन चंद्रपूरच्या वतीने चंद्रपूर तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कन्या घुगूस येथे राबविण्यात येत असलेल्या फुटबॉल खेळणाऱ्या विद्यार्थ्यांना किट वाटप करण्यात आले.

मॅजिक बस इंडिया फॉऊंडेशन चंद्रपूर चे जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रशांत लोखंडे यांचा मार्गदर्शनाखाली मॅजिक बस इंडिया फाउंडेशन चंद्रपूरच्या वतीने शाळेमध्ये शिक्षण घेत असलेल्या एकूण 20 विद्यार्थाना करिता (S4E) स्पोर्ट फॉर एक्सलेन्स हा उपक्रम गेल्या दिड वर्षापासून सुरू आहेत.स्पोर्ट फॉर एक्सलेन्स या उपक्रमातून ग्रामीण भागातील फुटबॉल खेळ खेळणाऱ्या विद्यार्थ्यांना जिल्हा स्तर, राज्यस्तर व राष्ट्रीय स्तरावर कशाप्रकारे नेता येईल आणि यासाठी लागणारी कोचिंग देणे तसेच त्यांना किट , शूज व इतर साहित्य हे मॅजिक बस इंडिया फाउंडेशन चंद्रपूर च्या माध्यमातून विद्यार्थ्यांकरिता वितरित करण्यात आले . या कार्यक्रमाला उपस्थित जि. प.उच्च प्राथ. शाळाचे मुख्याध्यापिका सौ मंदा मोरे मॅडम, केंद्र प्रमुख कातकर सर. शाळा वेवस्थपण समितीचे सदस्य, शाळेतील शिक्षक, नितेश मालेकर सर, गावातील नागरिक इत्यादी सदस्यांची उपस्थिती प्रार्थनीय होती. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी मॅजिक बसचे फुटबॉल कोच प्रणोती चौधरी आणि शाळा सहायक अधिकारी निकलेश चौधरी यांनी मोलाचे सहकार्य केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साहायक शिक्षक येरमे मॅडम यांनी केले. तर आभार प्रदर्शन काळे सर यांनी केले अशाप्रकारे हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यात आला.
धन्यवाद!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here